तडशिनहाळ येथे बांधकाम कामगार संघटनेच्या कार्यालयाचे शनिवारी उद्घाटन - चंदगड लाईव्ह न्युज

13 August 2021

तडशिनहाळ येथे बांधकाम कामगार संघटनेच्या कार्यालयाचे शनिवारी उद्घाटन

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       तडशिनहाळ (ता. चंदगड) येथील चंदगड तालुका बांधकाम कामगार कल्याणकारी असोसिएशन संघटनेच्या संपर्क कार्यालयाचे व कामगार सेना संर्पक कार्यालय उदघाटन सोहळा शनिवार दि.  १४ ऑगस्ट रोजी सकाळी १२वाजता आयोजित केल्याची माहिती अध्यक्ष कल्लाप्पा निवगिरे यानी दिली.             बांधकाम कामगारांना स्मार्ट कार्ड, सुरक्षा किट,अत्यावश्यक सेवा संच असा संयुक्त कार्यक्रम शिवसेना जिल्हा प्रमुख विजयदेवणे यांच्या हस्ते व उपजिल्हा प्रमुखप्रभाकर खांडेकर, विधानसभा संपर्क प्रमुख प्रा. सुनिल शिंत्रे, चंदगड विधानसभा संघटक संग्राम कुपेकर, महिला जिल्हा संघटीका सौ. संज्योतीताई मळविकर, उप संघटीका सौ. शांताताई जाधव, तालुका प्रमुख अशोक मनवाडकर, अनिल दळवी, राजू रेडेकर यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न होणार आहे. यावेळी बांधकाम कामगारांना स्मार्ट कार्ड, सुरक्षा किट, अत्यावश्यक सेवा संच चे वितरण करण्यात येणार आहे.

           या कार्यक्रमाला तालुक्यातील बांधकाम कामगार शाखा प्रमुख, शिवसैनिक, पदाधिकारी, कामगार सेनेचे पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन उपाध्यक्ष बाबू चौगुल यांनी केले.No comments:

Post a Comment