कुदनुरचे 'धनवंतरी' डॉ. कृष्णा पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

13 August 2021

कुदनुरचे 'धनवंतरी' डॉ. कृष्णा पाटील यांचे निधन

 

डॉ. कृष्णा पाटील

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
    कुदनूर (ता. चंदगड) येथील जुन्या जमान्यातील पैलवान व सुप्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर कृष्णा संताजी पाटील- कसलकर, वय ९७ यांचे दि. १३ रोजी सायंकाळी वृद्धापकाळाने कुदनूर येथे निधन झाले.
    पंचक्रोशीतील हजारो असाध्य आजारी रुग्णांना त्यांनी आत्तापर्यंत आपल्या आयुर्वेदिक उपचारांनी बरे केले होते. गेल्या ७० वर्षांपासून त्यांच्या उपचाराची ख्याती सर्वदूर असल्यामुळे पुणे, मुंबईचे रुग्ण सुद्धा आयुर्वेदिक (गावठी) उपचारासाठी डॉ. कृष्णा यांना शोधत यायचे. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आयुष्यभर (ऊन, पाऊस, थंडीत) कधीही पायात चप्पल वापरले नाहीत. त्यांच्या पश्चात दोन विवाहित चिरंजीव सुना नातवंडे असा परिवार आहे. अंत्यविधी शनिवारी दि १४ रोजी सकाळी ८ वाजता कुदनूर येथे आहे.No comments:

Post a Comment