माणगाव सर्कल अंतर्गत किणी- कोवाड येथे नुकसानीचे पंचनामे - चंदगड लाईव्ह न्युज

13 August 2021

माणगाव सर्कल अंतर्गत किणी- कोवाड येथे नुकसानीचे पंचनामे

 

किणी- कोवाड स्टँड परिसरात पुरात बुडालेल्या दुकानांचे पंचनामे करताना उपस्थित शासकीय पथक व आपदग्रस्त नागरिक.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
            माणगाव (ता. चंदगड) सर्कल अंतर्गत किणी- कोवाड येथे अतिवृष्टी व पुरात बुडून नुकसान झालेल्या घरे व दुकानांचे पंचनामे करण्यात आले. अशी माहिती सर्कल अधिकारी आप्पासाहेब जीनराळे यांनी दिली.
     कोवाड नजीकच्या ताम्रपर्णी नदीपलीकडील भाग किणी ग्रामपंचायत हद्दीत येतो. या परिसरात असलेली सर्वच दुकाने व घरे महापुरात बुडाली होती. यांची संख्या सुमारे ७९ असून यातील ४५ बाधित दुकाने, वर्कशॉप शोरूम व घरांचे पंचनामे शासकीय पथकाद्वारे आज दिनांक १३ ऑगस्ट रोजी करण्यात आले. उर्वरित पंचनामे उद्या करण्यात येणार आहेत. या पथकात सर्कल जीनराळे यांच्यासह पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता आनंदा खोत, विजय पाटील, तलाठी शिवदास वाघमारे, गोपाळ खूपसे, संतोष बोथीकर, सरपंच संदीप बिर्जे, पोलीस पाटील रणजीत गणाचारी, कोतवाल शोभा हदगल, सदानंद पाटील आदींचा समावेश होता पथकाद्वारे नुकसानीची पाहणी करून वस्तुनिष्ठ पंचनामे करण्यात आले. यावेळी आपदग्रस्त घर व दुकान मालक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment