ती रपेट राजकिय नव्हे, नवीन गाडीची ट्रायल होती........कोणती रपेट......वाचा......सविस्तर........ - चंदगड लाईव्ह न्युज

14 August 2021

ती रपेट राजकिय नव्हे, नवीन गाडीची ट्रायल होती........कोणती रपेट......वाचा......सविस्तर........

कारवे (ता. चंदगड) येथे दुचाकीवरून जाताना आमदार राजेश पाटील व भरमुअण्णांचे छायाचित्र

नंदकुमार ढेरे / चंदगड - सी. एल. वृत्तसेवा

           माजी मंत्री भरमुआण्णा पाटील आणि चंदगड राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार राजेश पाटील हे एकाच दुचाकीवरून फिरतानाचा व्हिडीओ दोन-तीन दिवसापूर्वी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्याने चंदगड तालुक्यात राजकिय चर्चाना ऊत आला होता. दोन विरोधक ऐन जिल्हा बँक, पं. स. व जिल्हा परिषद निवडणूक तोंडावर असताना एकाच गाडीवरून रपेट मारताना बघितल्यावर तालुक्यात राजकिय भूकंप होणार, तालुक्यातील राजकिय समिकरणे बदलणार, अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळाले. पण हा राजकिय फेरफटका नसुन मजरे कार्वे येथील इलेक्ट्रिक दुचाकी विक्री दुकानाच्या उदघाटन प्रसंगी  गाडीची ट्रायल घेण्यासाठी मारलेली रपेट होती. हे जेव्हा लोकांना समजले तेव्हा अनेकांचा भ्रमनिरास झाला.

           मजरे कारवे (ता. चंदगड) येथे यु एस इलेक्ट्रिक मोटर्स या नवीन सूरू झालेल्या शोरूमच्या शुभारंभ प्रसंगी आम राजेश पाटील व माजी मंत्री भरमुआण्णा पाटील हे दोघेजण प्रमुख पाहुण्यांच्या भुमिकेत एकत्र आले होते. उद्घाटनानंतर शोरूम मधील पहिल्या गाडीवरून दोघांनी रपेट मारावी असा उपस्थित लोकांनी आग्रह केल्यानंतर आमदार पाटील हे चालकाच्या व भरमुआण्णा हे पाठीवर अशिर्वाद रूपी हात ठेवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. चंदगड तालुक्यात पक्षीय राजकारणा पेक्षा व्यक्तिनिष्ठ राजकरणाला फार महत्त्व आहे. नेता कुठे जाईल तेथे कार्यकर्त्यांची फळी नेत्याच्या मागे खंबीरपणे उभी असते. हा आजपर्यंत इतिहास आहे. त्यामुळे तालुक्यातील नेते जरी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, असले तरी येणाऱ्या जिल्हा बँक, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत सोयीची भुमिका घेताना दिसतील. तीन वर्षांपासून भरमुअण्णांनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे. तर  आमदार पाटील यांनी यांनी काँग्रेसमधून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीत गोपाळराव पाटील व  भरमुअण्णांनी  भाजप प्रणित शिवाजी पाटील यांच्या बाजूने ताकद उभी केल्याने राजेश यांना विजयापर्यंतची वाट अवघड झाली होती. दरम्यान अलीकडेच भाजपच्या कुरघोडी राजकारणाला कंटाळून गोपाळराव यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. चंदगडला पक्षापेक्षा व्यक्तिनिष्ठ राजकारणाला अधिक महत्त्व आहे. नेता कुठे जाईल तेथे कार्यकर्त्यांची फळी खंबीरपणे असते. दोन  व्यक्तिनिष्ठ गट एकत्र आले तरच निवडणूका सोप्या जातात हा अनुभव  येथील जनतेला आहे. त्यामुळे आमदार पाटील व माजी मंत्री भरमूआण्णा पाटील विरोधक  दुचाकीवरून एकत्र रपेट मारताना आगामी निवडणुकीत एकत्र येण्यासंदर्भात कानात का चर्चां करू नये, अशीही चर्चा तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये होताना दिसत आहे.

No comments:

Post a Comment