सत्यशोधक, सर्पमित्र कै. बाबुराव टक्केकर स्मृतिदिनापूर्वी सर्पोद्यानला जागा मिळावी - ॲड. मळविकर व उपाध्यक्ष वाघमारे यांची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

14 August 2021

सत्यशोधक, सर्पमित्र कै. बाबुराव टक्केकर स्मृतिदिनापूर्वी सर्पोद्यानला जागा मिळावी - ॲड. मळविकर व उपाध्यक्ष वाघमारे यांची मागणी

ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथील सर्पशाळेत नागपंचमीनिमित्त उपस्थित मान्यवर. 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथे 55 व्या नागपंचमीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने  कोरोना नियमांचे पालन करून  सत्यशोधक, संस्थापक, सर्पमित्र कै. बाबुराव टक्केकर यांच्या प्रतिमेचे व सर्प प्रतिमेचे पूजन करून नागपंचमी चा औपचारिक कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष डॉ. नितीन चौगुले होते. यावेळी प्रमुख पाहुणे अॅड. संतोष मळवीकर उपस्थित होते.

      ही सर्पशाळा म्हणजे ढोलगरवाडी परीसर व संपूर्ण महाराष्ट्राची अस्मिता आहे या सर्पशाळेमुळे आजपर्यंत हजारो सर्पमित्र तयार झाले तसेच सापांच्या बद्दलच्या अंधश्रद्धा दूर करून समाजात जनजागृती करणारी  जगातील पहिली सर्प शाळा आहे. आज पर्यंत  या सर्पशाळेकडे पूर्ण दुर्लक्ष झालेले आहे.जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये तहसिलदार चंदगड यांनी दि .९/३/२०२०  च्या पत्रान्वये सरकारी जमिनीचे मोजमाप झाल्यानंतर सर्पोद्यान साठी जमिन देण्याचे कळविलेले आहे. तरी इतर जमिनीच्या हद्दी शासन नियमातील तरतुदीस अनुसरून मोजणी करून येत्या २५ नोव्हेंबरला होणाऱ्या सत्यशोधक, संस्थापक,सर्पमित्र बाबूराव टक्केकर यांच्या स्मृतीदिना पूर्वी या सर्पशाळेला शासनाने प्रशस्त जागा द्यावी अशी मागणी ॲड संतोष मळवीकर व संस्था उपाध्यक्ष  तानाजी वाघमारे यांनी केली आहे.

               ही सर्पशाळा चंदगड तालुक्यासाठी चांगले पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी समाजातील सर्व घटकातील लोकांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन तानाजी वाघमारे यांनी केले आहे.

          या कार्यक्रमाला ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.सरिता तुपारे, उपसरपंच  व्हनापा तुपारे संस्थेचे संचालक शिवाजी चौगुले, एन. एन. पाटील, संस्थेच्या संचालिका शांता टक्केकर, माजी मुख्याध्यापक  शिवाजी कोकितकर, धानबा कदम, माजी सरपंच दिवाकर पाटील, व्ही. आर. पाटील, सर्पमित्र प्रा. सदाशिव पाटील, माजी सरपंच कल्लाप्पा पाटील, एन. आर. पाटील, प्रकाश टक्केकर, तानाजी कांबळे, किशोर गोसावी, संदीप टक्केकर, प्रकाश सुभेदार, अश्विनी टक्केकर, अनिल गावडे, इंद्रजीत टक्केकर, मारुती बुवा, अर्जुन टक्केकर, संतोष सुभेदार वन विभागाचे अधिकारी,कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. प्राचार्य एन. जी. यळ्ळूरकर यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment