रयत सेवा फौंडेशनचा धनगरवाडयाला आयुर्वेदिक बुस्टर डोस, आरोग्य शिबीर घेऊन मोफत औषध वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

14 August 2021

रयत सेवा फौंडेशनचा धनगरवाडयाला आयुर्वेदिक बुस्टर डोस, आरोग्य शिबीर घेऊन मोफत औषध वाटप

रयत सेवा फौंडेशनकडून आरोग्य तपासणी करताना कर्मचारी

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

         आज आपण  इंटरनेटच्या माध्यमातून आभासी जगात वावरत आहोत. सगळ्या सोयीसुविधा आपल्या पायाशी लोळण घेत आहेत. पण आजसुद्धा चंदगड तालुक्यातील बऱ्याच धनगरवाड्यांवर रस्ते, आरोग्य, शिक्षण यांची वाणवा आहे. चंदगड तालुक्यात एकूण सतरा धनगरवाडे आहेत. त्यापैकी रयत सेवा फौंडेशन दाटे यांच्या मार्फत कलिवडे धनगरवाडा व जंगमहट्टी धनगरवाडा येथे आरोग्य शिबीर आयोजित केले होते.

        यावेळी मंत्रालयीन अधिकारी व रयत सेवा फौंडेशनचे मार्गदर्शक घनश्याम पाऊसकर म्हणाले, 'गावच्या विकासात रस्ते, पाणी, वीज याचबरोबर आरोग्य व शिक्षण या सुविधा असणे गरजेचे आहे. आपल्या आरोग्याची योग्य काळजी घेतली तर अनेक आजारांना आपण दूर ठेऊ शकतो. ज्या गावात डॉक्टर पोहचू शकत नाहीत. अशा ठिकाणी आमच्या रयत सेवा फौंडेशन कडून आरोग्य शिबीर आयोजित करून मोफत औषधांचे वाटप करण्यात आले .'

          या वेळी कोल्हापूर डॉ. सचिन जिरगे, श्रीमती कल्याणी जिरगे यांनी लोकांची मोफत तपासणी करून औषधोपचार दिले. यावेळी मारूती किंदळेकर, परशराम किनेकर, ज्ञानेश्वर गावडे, रवी गुरव, मनोज खरूजकर, महादेव साबळे, रविंद्र पाटील, संजय साबळे, सुनिल सुतार, युवराज कांबळे, शाहू खरुजकर, मोनापा नाईक, अमोल सुतार, श्रीकांत पाटील, रामू शेळके, सिद्धू शेळके, तानाजी बाजारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment