'महादेव कोळी' दाखले मिळण्याबाबत चंदगड मधील समाज बांधव आशावादी! - चंदगड लाईव्ह न्युज

28 August 2021

'महादेव कोळी' दाखले मिळण्याबाबत चंदगड मधील समाज बांधव आशावादी!


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

          चंदगड तालुक्यातील कामेवाडी, चिंचणे, कल्याणपूर आदी गावांत  महादेव कोळी बांधवांचे अनेक वर्षांपासून वास्तव्य आहे. जुन्या बेळगाव तालुक्यात असणाऱ्या या गावातील लोकांना शासनाकडून अनुसूचित जमाती 'जात प्रमाणपत्र' मिळत होते. पण शासनाकडून असे दाखले मिळणे सध्या बंद झाले आहे. हे दाखले पुन्हा मिळवण्यासाठी चंदगड किंबहुना कोल्हापूर जिल्ह्यातील आदिवासी महादेव कोळी बांधव प्रयत्नशील आहेत.
            याकामी न्यायालयीन लढ्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचे महादेव कोळी म्हणून चंदगड तालुक्याच्या पूर्व भागातील जंगल पट्ट्यात वास्तव्य असल्याचे पुरावे उपलब्ध करून दिले जात आहेत.
प्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञ  एम. ए. शेरींग यांच्या The Hindu Tribes and Castes या सन 1879 मध्ये प्रकाशित झालेल्या महत्त्वपुर्ण पुस्तकानुसार The term 'Dongari' evidently comes from 'Dongar' a hill; and hence Kolis of the hilly areas are sometimes called Dongar Koli असे स्पष्टपणे नमुद केले आहे.
       तसेच, मुंबई इलाख्याचे प्रसिद्ध ब्रिटिश मानववंशशास्त्रज्ञ आर. इ. इंथोवेन यांच्या मतानुसार "डोंगर कोळी" हेच महादेवकोळी आहेत असे त्यांनी आपल्या सुप्रसिद्ध The Tribes and Castes of Bombay presidency या पुस्तकात पान क्रमांक 341 वर खालीलप्रमाणे मजकूर नमुद  आहे. Dongar Koli a synonymous name for Mahadev Koli. या व्याख्येनुसार चिंचणे-कामेवाडी आदी गावातील लोक 'महादेवकोळी' किंवा 'कोळीमहादेव' जमातीचे ठरतात. वरील ब्रिटिश कालीन संशोधनानुसार या जमातीच्या  नोंद कोळी अशी आहे.

            सन 1931 व 1941 च्या जनगणनेत  चंदगड तालुक्यातील संबंधित गावातील आदिवासींच्या 'कोळी महादेव' अशाच नोंदी आहेत. वरील पुराव्यावरून शासनाने महादेवकोळी जमातीचे दाखले यापुर्वी दिले आहेत. तथापि विविध कारणांनी दाखले देणे सध्या बंद आहे. शासन व न्यायालयात वास्तव्य सिध्द करून अनुसूचित जमातीचे प्रमाणापत्र पूर्वीप्रमाणे मिळवण्यात यशस्वी ठरू. असा आशावाद येथील आदिवासी समाजाने व्यक्त केला आहे.



No comments:

Post a Comment