माळी ते माळी फाटा दरम्यानच्या रस्त्याची चाळण, तातडीने दुरुस्तीची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

28 August 2021

माळी ते माळी फाटा दरम्यानच्या रस्त्याची चाळण, तातडीने दुरुस्तीची मागणी

माळीकडे जाणऱ्या रस्त्याची झालेली दुरावस्था.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          न्हावेली व उमगावच्या दरम्यान असलेल्या माळी ते माळी फाटा दरम्यानच्या रस्त्याची अक्षरक्ष: चाळण झाली आहे. हा केवळ कच्चा रस्ता असून या रस्त्यावर कधीही डांबर पडले नाही. रस्ता झाल्यापासून या रस्त्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष आहे. 

     या रस्त्याचा वापर माळी, नागवे, खळणेकरवाडी, अमृस्करवाडी या गावातील लोक करतात. हा रस्ता करण्यासाठी टाकलेले दगड उखडून गेले आहेत. रस्त्यात खड्डा कि खड्यात रस्ता अशीच काहीशी अवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने पावसाचे पाणी साचून या रस्त्यावरुन वाहन नेणे तर सोडाच चालणेही कठीण झाले आहे. शेती व व्यवसायाच्या निमित्ताने रोज अनेक लोक या रस्त्यावरुन प्रवास करतात. या रस्त्यावरुन प्रवास करताना खड्यामुळे अनेक अपघात झाले आहेत. रोज प्रवास करणाऱ्या लोकांना कंबरदुखी व अंगदुखी सारख्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देवून रस्त्याच्या डांबरीकरणाचा प्रश्न मार्गी लावून प्रवाशांची सोय करावी. अशी मागणी या मार्गावरुन प्रवास करणारे प्रवाशी व परिसरातील नागरीकांनी केली आहे. 

No comments:

Post a Comment