शिक्षणतज्ञ डी. बी. पाटील शैक्षणिक मंच चंदगड शाखेची स्थापना, अध्यक्षपदी प्राचार्य आर. आय. पाटील यांची निवड - चंदगड लाईव्ह न्युज

28 August 2021

शिक्षणतज्ञ डी. बी. पाटील शैक्षणिक मंच चंदगड शाखेची स्थापना, अध्यक्षपदी प्राचार्य आर. आय. पाटील यांची निवड

निवडीचे पत्र स्विकारताना आर. आय. पाटील


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        चंदगड  तालुक्यातील महात्मा फुले विद्यालय व म. भु. तुपारे ज्युनिअर कॉलेज कारवे येथे शिक्षणतज्ञ डी. बी. पाटील शैक्षणिक विचार मंच कोल्हापूर यांची सहविचार सभा संपन्न झाली. अध्यक्षस्थानी जेष्ठ मार्गदर्शक एस. डी. लाड होते.

        शिक्षणतज्ञ कै. डी. बी. पाटील सरांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य अतुलनीय आहे. शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी आयुष्यभर त्यांनी ध्यास घेतला.अशा या थोर शिक्षण तज्ञांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी शिक्षणतज्ञ डी. बी. पाटील शैक्षणिक विचार मंच कोल्हापूर मार्फत चंदगड तालुक्यात सह विचार मंचाची शाखा स्थापना करण्यात आली. तालुका अध्यक्ष म्हणून न्यू इंग्लिश स्कूल व न.भु. पाटील ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य आर. आय. पाटील यांची एकमुखी निवड करण्यात आली. चंदगड तालुका कार्यकारिणी जाहीर करून त्यांना निवडीचे पत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. 

         कार्यकारिणी पुढील प्रमाणे - अध्यक्ष - प्राचार्य आर. आय. पाटील दि न्यू इंग्लिश स्कूल व न. भु. पाटील ज्युनिअर कॉलेज चंदगड, कार्याध्यक्ष- प्राचार्य एस. एन. पाटील श्रीराम विद्यालय व श्रीमान व्ही.पी. देसाई ज्युनियर कॉलेज कोवाड ,उपाध्यक्ष- प्राचार्य एस. जी. पाटील श्री रामलिंग हायस्कूल व ज्युनियर कॉलेज तुडये , उपाध्यक्ष - मुख्याध्यापक एन.एस.पाटील भाई दाजीबा देसाई हायस्कूल पार्ले , सचिव - मुख्याध्यापक व्ही. के. फगरे श्री भावेश्वर विद्यामंदिर आमरोळी ,सहसचिव-प्राचार्य डी. जी.कांबळे श्री रवळनाथ माध्य. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज चंदगड , खजिनदार - मुख्याध्यापक आर. एस. भोगण श्री वैजनाथ विद्यालय देवरवाडी ,महिला सदस्य मुख्याध्यापिका सौ.ए.ए.देवण भावेश्वरी संदेश माध्यमिक विद्यालय कानूर , प्रसिद्धी प्रमुख - प्राध्यापक ए.टी.पाटील श्रीराम विद्यालय व व्ही.पी.देसाई ज्युनियर कॉलेज कोवाड ,सेवानिवृत्त प्रतिनिधी माजी प्राचार्य एस. व्ही. गुरबे व माजी प्राचार्य वाय. व्ही.कांबळे , निमंत्रित सदस्य - पर्यवेक्षक एस.ए.पाटील जनता विद्यालय तुर्केवाडी व अजित पां. गणाचारी शिक्षकेत्तर कर्मचारी शिवशक्ती हायस्कूल अडकूर , मार्गदर्शक - माजी मुख्याध्यापक ए.डी.देसाई व माजी मुख्याध्यापक आय.के.स्वामी यांची पदाधिकारी म्हणून निवड करून कार्यकारिणी सदस्यपदी - मुख्याध्यापक एम.आर.भोगूलकर संजय गांधी विद्यालय नागणवाडी ,मुख्याध्यापक ए.के. पाटील श्री दत्त हायस्कूल राजगोळी बुद्रुक , मुख्याध्यापक पी.टी.वडर हनुमान विद्यालय मांडेदुर्ग , मुख्याध्यापक एम.एम. सुतार यशवंतराव चव्हाण हायस्कूल सुरूते , सहाय्यक शिक्षक टी.टी .बेर्डे दि न्यू इंग्लिश स्कूल चंदगड , मुख्याध्यापक पी . जे.दियॉस आदर्श हायस्कूल कामेवाडी , तंत्रस्नेही शिक्षक रवींद्र पाटील राजर्षी शाहू विद्यालय शिनोळी बु. , मुख्याध्यापक सुभाष बी.भोसले स्वयंभू विद्यालय उमगांव , सहा. शिक्षक महादेव शिवणगेकर बी. डी. विदयालय व ज्युनि. कॉलेज बागिलगे - डुक्करवाडी व  सहा. शिक्षक प्रदिप बंडू जाधव माऊली विद्यालय  तिलारीनगर यांची निवड करण्यात आली.

           या शैक्षणिक मंचामार्फत शिक्षण क्षेत्रात अनेक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न मंचाच्या असेल यासाठी प्राचार्य, मुख्याध्यापक, सहाय्यक शिक्षक व शिक्षकेतर पर्यंत या शिक्षण क्षेत्रातील ज्या आडीअडचणी, प्रश्न असतील ते न्यायिक मार्गाने सोडण्याचा हा मंच प्रामाणिक प्रयत्न करेल. तसेच प्रसंगी अन्यायाविरुद्ध लढा उभारण्याचा निर्धार असल्याचा या मंचाच्यावतीने मार्गदर्शक बी. जी. काटे यांनी सांगितले.

          यावेळी मार्गदर्शक एस.डी.लाड , बी.जी.काटे , के. बी. पवार , सचिव आर.वाय. पाटील , मंचचे अध्यक्ष व्ही. जी. पवार , उपाध्यक्ष डी. एस. घुगरे , राज्य  मुख्याध्यापक महामंडळ सदस्य बी.बी.पाटील, सदस्य रंगराव तोरस्कर , डॉ.ए.एम.पाटील , जयसिंग पवार ,दत्तात्रय जाधव , के. के. पाटील , प्राचार्य ए. एस. रामाणे ,बी. एस. कांबळे , प्राचार्य एम.एम.गावडे , मुख्याध्यपक चौगुले यासह आदी मान्यवर या मंचावरती उपस्थित होते. तालुक्यातील आजी -माजी मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.

        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी प्राचार्य वाय. व्ही कांबळे यांनी केले. तर आभार माजी प्राचार्य शांताराम व्ही. गुरबे यांनी मानले.

No comments:

Post a Comment