मजरे कारवे येथील महात्मा फुले विद्यालयाचे बारा विद्यार्थ्यी एन. एम. एम. एस. शिष्यवृत्तीधारक - चंदगड लाईव्ह न्युज

28 August 2021

मजरे कारवे येथील महात्मा फुले विद्यालयाचे बारा विद्यार्थ्यी एन. एम. एम. एस. शिष्यवृत्तीधारक

मजरे कारवे येथील महात्मा फुले विद्यालयाच्या एन. एम. एम. एस. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यी व मार्गदर्शक शिक्षक.
 

माणगाव (राजेंद्र शिवणगेकर)

            चंदगड तालुक्यातील महात्मा फुले विद्यालय मजरे कारवे येथील बारा विद्यार्थी एन. एम. एम. एस. शिष्यवृत्तीधारक झाले.  मजरे कारवे केंद्राचे केंद्रप्रमुख बाळू हरीबा प्रधान यांनी सर्व शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक यांना डायरी गिफ्ट देवून त्यांचे अभिनंदन केले.

           केंद्रप्रमुख बाळू प्रधान यांच्या कौतुक कार्याचा इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी आणि दरवर्षी जास्तीतजास्त विद्यार्थ्यांना एन. एम. एम. एस. परीक्षेचा लाभ घ्यावा. अशा अपेक्षेने या छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महात्मा फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक  एम. एन. गावडे,  एस. वाय. कुंभार, शिक्षक वृंद तसेच केंद्रमुख्याध्यापक मनोज बुच्चे उपस्थित होते.No comments:

Post a Comment