भगतसिंग अकॅडमीमार्फत तुडये येथील रामलिंग हायस्कूलच्या गुणवंतांचा सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

28 August 2021

भगतसिंग अकॅडमीमार्फत तुडये येथील रामलिंग हायस्कूलच्या गुणवंतांचा सत्कार

तुडये येथे गुणवंत विद्यार्थ्यीचा सत्कार करताना भरत गावडे

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

            भगतसिंग अकॅडमी, हलकर्णीचे संचालक भरत गावडे व त्यांची टीम यांनी आज श्री रामालिंग हायस्कूल व ज्युनि. कॉलेजला भेट देवून NMMS परीक्षा २०२१ मध्ये यश प्राप्त केलेल्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. 

        या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक  आर. डी. पाटील, व्ही. एल. सुतार, आर. झेड. पाटील,  व्ही. एम. पाचवडेकर यांचा सत्कार करण्यात आला. भरत गावडे  यांनी आपल्या अकॅडमी मार्फत या विद्यार्थ्यांना भविष्यात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अश्वासन देवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत प्रोत्साहीत केले. या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य  एस. जी. पाटील, कार्वे गावचे उपसरपंच  पांडुरंग बेनके, सामाजिक कार्यकर्ते बापू शिरगांवकर, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. व्ही. एल. सुतार यांनी सूत्रसंचालन केले व  ए. टी. पाटील  यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment