सलामवाडी येथे हालसिद्धेश्वर नूतन पालखी व मूर्ती अभिषेक सोहळा संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

28 August 2021

सलामवाडी येथे हालसिद्धेश्वर नूतन पालखी व मूर्ती अभिषेक सोहळा संपन्न

पालखी सोहळा

नेसरी / सी. एल. वृत्तसेवा

           सलामवाडी तालुका हुक्केरी येथील जागृत देवस्थान श्री हालसिद्धेश्वर नूतन पालखी व मूर्ती अभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. दि 26 रोजी गावच्या सीमेवर आगमन व पूजन करून भजन दिंडीने पालखी व मूर्तीचे स्वागत करण्यात आले. यानंतर ढोल वादनाच्या गजरात गावच्या वेशीत आगमन झाले यानंतर आरतीसह पूजा झाली व वाजत गाजत पालखी लक्ष्मी मंदिराकडे रवाना झाली. या ठिकाणी लक्ष्मी देवालयात नूतन पालखीचा अभिषेक व पूजा झाली. यानंतर हालसिद्धेशवर मंदिराकडे प्रयाण झाले व मंदिर परिसरात स्थानापन झाले व रात्री भजन व धनगरी ओव्यांचे गायन झाले. दि. २७ रोजी सकाळी ७ ते ११ या वेळेत मूर्तीवर अभिषेक झाला. यानंतर पालखी सजावट, ढोलवादन, संगीतमय वाद्यांच्या गजरात पालखी मिरवणूक झाली. भजन, ढोलवादन, महिलांच्या झिम्मा फुगडी कार्यक्रमाने व महाप्रसादाने उत्सवाची समाप्ती झाली.

No comments:

Post a Comment