हेरे सरंजाम मधील चोपन्न गावांच्या वर्ग दोन जमीनी वर्ग एक करण्याकामी खूपच विलंब होत आहे. हे काम मार्गी लावण्यासाठीचे निवेदन चंदगड तालुक्यातील पुरपरिस्तीतीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या सतेज उर्फ बंटी पाटील यांची कानडी गावात शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भेट घेऊन निवेदन दिले.
हेरे सरंजाम मधील कानूर, कूरणी, बुझवडे, फाटकवाडी, कानडी इतर चोपन्न गावातील सरंजाम जमिनीच्या वर्ग दोन चे वर्ग एक करण्या बाबत आदेश झाले आहेत. मात्र या प्रकरणी चंदगड तहसीलदार कार्यालया कडील तहसीलदार, तलाठी, सर्कल यांना संंबंधितत कामे मार्गी लावण्यासाठी विलंब होत असल्याने आदेश करावा अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी भाईसाहेब जंगमहट्टीकर, रवींद्र पाटील, काॅंग्रेसचे गोविंद पाटील इत्यादी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment