चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगारांची बैठक बुधवार ११ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११ वाजता कारखाना कार्यस्थळावरील गणेश मंदिरात आयोजित केली आहे.
या बैठकीत प्रलंबित विषयावर चर्चा करून पूढील धोरण ठरविण्या बाबत चर्चा करण्यात येणार आहे. तसेच या बैठकीला सर्व श्रमिक संघटनेचे काॅ.अतुल दिघे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे दौलत कारखान्यातून आज अखेर सेवानिवृत्त झालेल्या सर्व कामगारांनी या बैठकीला वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन दौलत सेवानिवृत्त श्रमिक संघटनेमार्फत करण्यात आले आहे.


No comments:
Post a Comment