कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया जाणून घ्या. १८ ते ४४ वयोगटातील लस घेण्यासाठी रजिस्ट्रेशन आवश्यक. जाणून घ्या......... - चंदगड लाईव्ह न्युज

08 August 2021

कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया जाणून घ्या. १८ ते ४४ वयोगटातील लस घेण्यासाठी रजिस्ट्रेशन आवश्यक. जाणून घ्या.........

लस देतानाचे प्रातिनिधीक छायाचित्र

        वय वर्ष 18 ते वय वर्षे 44 दरम्यानच्या व्यक्तीने लस घेण्यासाठीची प्रक्रिया पुढीलप्रमाणे.

१) सध्या वरील वयोगटासाठी लसीकरण केंद्र चंदगड तालुक्यामध्ये फक्त ग्रामीण रुग्णालय चंदगड येथे सुरू करण्यात आलेले आहे व अडकूर च्या नजदीक ग्रामीण रुग्णालय नेसरी येथे सुद्धा सदरील 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण केंद्र चालू झालेले आहे

                          CSC वरुन नोंंदणी करताना हा चार्ट बघा.

२)cowin.gov.in या वेबसाईटवर जाणे

३) रजिस्ट्रेशन वर क्लिक करणे

४) मोबाईल नंबर टाकावा

५) जो मोबाईल नंबर टाकला आहे त्या नंबर वर OTP येईल तो OTP टाकून व्हेरिफाय करावे.

६) त्यानंतर add member करावे.

७) नाव, लिंग व जन्मतारीख इत्यादी वैयक्तिक माहिती भरावी

ही माहिती भरल्यानंतर रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल.

8) आत्ता अपॉइंटमेंट घेण्यासाठी शेडूल वर क्लिक करावे

9) चंदगड तालुक्याचा पोस्टल पिन कोड 416509 हा टाकावा

जर आपल्याला ग्रामीण रुग्णालय चंदगड येथे जाऊन लस घ्यायची असल्यास चंदगड येथील पोस्टल पिनकोड टाकावा.

10) लस बुकिंग साठी वयोगट लसीचा प्रकार इत्यादी बाबी निवडाव्यात.

11) लसीकरणाची तारीख आपल्या सोयीनुसार टायमींग सिलेक्ट करावे.

12) तारखेनुसार लसीचा स्लॉट बुकिंग करावे

लसीचा स्लॉट बुकिंग साठी साधारणपणे दररोज चार वाजता उपलब्ध असतो.

     आपल्याला ज्या दिवशी लस घ्यावयाची आहे. त्याच्या एक दिवस अगोदर म्हणजेच आदल्या दिवशी संध्याकाळी चार वाजल्यापासून लसीचे स्लॉट बुकिंग चालू होते.

11) स्लॉट बुकिंग प्रमाणे मिळालेल्या दिनांक दिवशीच आपण सदरील ठिकाणी जाऊन लस घेण्याचे आहे

12) अपॉइंटमेंट च्या दिवशी आपण लस न घेतल्यास अपॉइंटमेंट कॅन्सल होते व अशावेळी लस घेण्यासाठी आपणास पुन्हा अपॉइंटमेंट घ्यावी लागते.

           एक लक्षात घ्या रजिस्ट्रेशन करणे ही एक वेगळी प्रोसिजर आहे व प्रत्यक्ष लस घेण्यासाठी स्लॉट बुकिंग करणे ही एक वेगळी प्रोसिजर आहे

         चंदगड तालुक्यातील 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना विनंती आहे की वरीलप्रमाणे कार्यवाही करून ग्रामीण रुग्णालय चंदगड अथवा 18 ते 44 वयोगटातील लस उपलब्ध असलेल्या ठिकाणी बुकींग करावे व जास्तीत जास्त नागरिकांनी लस घ्यावी. असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने केले आहे. 



1 comment:

Unknown said...

Rutuja Rajarm patil

Post a Comment