डी. आय. पाटील यांचे शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य - आमदार राजेश पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

08 August 2021

डी. आय. पाटील यांचे शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य - आमदार राजेश पाटील

कुदनुर (ता. चंदगड) येथे केंद्रप्रमुख डी. आय. पाटील यांचा सपत्नीक सत्कार करताना आमदार राजेश पाटील, बाजूला उपसरपंच नामदेव कोकीतकर, यशवंत चौधरी, गोविंद पाटील आदी.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        कडलगे बुद्रुक (ता. चंदगड) येथील डी. आय. पाटील हे कुदनूर केंद्रप्रमुख म्हणून निवृत्त झाले आहेत. चाळीस वर्षे त्यांनी आपल्या कार्यपध्दतीने शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. शिक्षक म्हणून समाजहिताची  विचारधारा जपणारे डी. आय. पाटील हे विद्यार्थीप्रिय शिक्षक आहेत, असे प्रतिपादन आमदार राजेश पाटील यांनी केले. कुदनूर (ता. चंदगड) येथील प्राथमिक मराठी शाळेत आयोजित सेवानिवृत्तीनिमित्त जाहीर सत्कार समारंभात ते बोलत होते.

          स्वागत दस्तगीर उस्ताद यांनी केले. यावेळी केंद्रप्रमुख डी. आय. पाटील व सौ. सुनिता पाटील या दांम्पत्याचा आ. राजेश पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यानंतर विविध संस्था, संघटना व व्यक्तींनी डी. आय. पाटील यांना सन्मानित केले. यावेळी केंद्रप्रमुख पाटील यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल विविध मान्यवरांनी भावना व्यक्त केल्या. डी. आय. पाटील यांचेही कृतज्ञतापर भाषण झाले.

            यावेळी उप सरपंच नामदेव कोकीतकर, अ‍ॅड. रवी रेडेकर, माजी केंद्रप्रमुख वसंत जोशीलकर, डी. एस. उस्ताद, गोविंद पाटील, शिक्षक बँक संचालक शिवाजी पाटील, माजी प्राचार्य ए. एस. पाटील,  सदानंद गावडे, बाबूराव जाधव, केंद्रप्रमुख संघटना अध्यक्ष यशवंत चौधरी, शंकर शिंदे, रामचंद्र पाटील, तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष रमेश हुद्दार तानाजी गडकरी, वैद्यकीय अधिकारी सुधाकर पाटील यांच्यासह तालुक्यातील शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.अप्पाजी रेडेकर यांनी सूत्रसंचालन तर यादू मोदगेकर यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment