शिक्षणाबरोबरच समाज परिवर्तन घडवणारी वि. म. बुगडीकट्टे शाळा - चंदगड लाईव्ह न्युज

14 August 2021

शिक्षणाबरोबरच समाज परिवर्तन घडवणारी वि. म. बुगडीकट्टे शाळा

 

कामाना निंगापा नाईक


नेसरी प्रतिनिधी / पुंडलिक सुतार

शिक्षण हे परिवर्तनाचे प्रभावी माध्यम .यामुळे समाजात शांतियुक्त क्रांतीची निर्मिती .सामाजिक परिवर्तन घडताना धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा,इतिहास,ज्ञान -   परंपरा व आधुनिकतेची जाण गरजेची असते व्यक्तींच्या सर्वांगीण विकासात शरीर,मन , बुद्धी व आत्मविश्वास निर्माण करणारी प्रणाली म्हणजे शिक्षण होय.शिक्षणाने विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास व आत्मगौरव प्राप्त होतो

या आत्मगौरवासाठी प्राथमिक शिक्षण समृद्ध व परिपूर्ण मिळणे गरजेचे असते.ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम करणे गरजेचे त्याला सामाजिक तथा गावाच्या सहकार्याने ते आपण पूर्ण करू .समाजाची साथ शिक्षणाला मिळाल्याने विद्यार्थी स्वावलंबी,संस्कारीत,आत्मनिर्भर,स्वाभिमान इ.मूल्ये विकसित समृद्धी निर्माण होते.या समृद्धीसाठी प्राथमिक शाळा परिपूर्ण असणे गरजेचे आहे.विद्या मंदिर बुगडीकट्टे शाळा हि कन्नड भाषिक मधील वसलेली.शेती हा येथील लोकांचा मुख्य व्यवसाय त्याला जोडव्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाची साथ .सामाजिक सहकार्याने गावात क्रांती,शैक्षणिक क्रांती निर्माण होण्यासाठी दातृत्व व्यक्तींचे आवाहन विद्यार्थ्यांच्या बौद्धिक प्रेरणा निर्माण करण्यासाठी शाळेच्या भौतिक सुविधतेची परिपूर्णता केले .यामध्ये चराचरात  ज्ञानभंडार मिळण्यासाठी बोलका व्हरांडा ,शाळेच्या वर्गात रनिंग बोर्ड ,सर्व विद्यार्थ्यांना सामूहिक परिपाठ,योगासने,यासाठी शाळेच्या प्रांगणामध्ये फेविंग ब्लॉक ,शुद्ध पाणी मिळण्यासाठी वॉटर फिल्टर ,पाणी मुबलक प्रमाणात वापर करण्यासाठी सुसज्ज वॉटर फिल्टर ,सदाबहार सुंदर बगीचा,सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी शैक्षणिक कलामंच

            विद्यार्थ्यांच्या बौद्धिक प्रेरणेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची साथ म्हणून प्रोजेक्टर उत्कृष्ठ संगणक कक्ष ,प्रत्येक वर्गामध्ये डिजिटल क्लासरूम ,स्थानिक पदाधिकारी यांच्या सहकार्याने विज्ञान प्रयोग साहित्य ,क्रीडासाहित्य यामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी क्रीडांगणची निर्मिती या सर्व कार्याची पूर्तता करून सामाजिक सहकार्याने शैक्षणिक क्रांती घडली 8 लाख 75 हजार शैक्षणिक उठावाद्वारे जिल्ह्यात आदर्शवत शाळा निर्माण केली

                 याबरोबर शिष्यवृत्ती मार्गदर्शन,विविध स्पर्धा परीक्षेसाठी तयारी,प्रश्न मंजुषा,आदर्श संगीतमय परिपाठाची निर्मिती,ज्यादा तासाचे नियोजन .

          शाळेची वैशिष्ठ्ये

(1) उत्कृष्ठ संगणक कक्ष

(2) डिजिटल क्लासरूम व ई-लर्निंग द्वारे अध्ययन-अध्यापन

(3)संपूर्ण शाळा बोलका व्हरांडा,व स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक ज्ञान भांडार

(4)शाळेसमोर फेविंग ब्लॉक

(5)कलामंच(सांस्कृतिक कार्यक्रम)

(6)संपूर्ण शाळेस शुद्ध वॉटर फिल्टरची सोय

            या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे करिक्युलर व एक्स्ट्रा करीक्युलर करण्यास सहकार्य लाभले.समाजाकडून मिळणाऱ्या संधीच सोनं करण्यास हातभार झाला.यामुळे शाळा व समाज यातील दरी कमी झाली .प्रत्येक पालक वर्गाला माझी शाळा वाटू लागली .आम्ही निर्माण केलेली शाळा अशा भावना समाजामध्ये निर्माण झाली.यामुळे खाजगी माध्यमाच्या शाळेकडे पालकांचा कल कमी झाला व शाळेचा पट सुद्धा वाढला.

                  एखाद्या शैक्षणिक क्रांतीचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून बुगडीकट्टे शाळेला पहिले जाते.समाजाने उदात्त हेतूने केलेले सहकार्य त्यातून निर्माण झालेली माझी शाळा व माझा परिवार निर्मिती भावना ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली.पंचक्रोशीतील एक आदर्शवत समाज व आदर्शवत शाळा म्हणून नावारूपास आली.

      धन्य तो समाज , धन्य ती शाळा

           शब्दांकन- कामाना निंगापा नाईक

(सहा.अध्यापक-विद्यामंदिर बुगडीकट्टे )


          कोरोना

मानवच राहतो जातीधर्माच्या ,पंथाच्या चौकटीत

ना प्राणी,ना पक्षी,ना जिवाणू या अडगळीत

रंक ना राव,श्रीमंत ना गरीब,ना कोणता भेदभाव

सकल जीव सृष्टीवरच झाला कोरोनाचा प्रादुर्भाव

         एक सूक्ष्मजीव तोडतोय सारी बंधने

पराक्रमी मनुष्य घाबरतोच कोरोनाच्या नावाने

हात धुवा,मास्क लावा,अस्तित्वाचा प्रश्न आहे

सकल जीव सृष्टीवरच झाला कोरोनाचा प्रादुर्भाव

          श्वास गुदमरलाय साऱ्या मानव जातीचा

धडा घेईल का मानव?कोरोना साथीचा

शिकवतोच धडा तो शिकाल तुम्ही एकता

समजू नका कमी कोणाला ,तरंच टिकेल हि मानवता,तरंच टिकेल हि मानवता!

         कवी- कामाना निंगापा नाईक (प्राथमिक शिक्षक-विद्यामंदिर बुगडीकट्टे)No comments:

Post a Comment