बुक्कीहाळ बुद्रुक येथे शॉक लागून दोन म्हशींचा मृत्यू, दीड लाखांचे नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

14 August 2021

बुक्कीहाळ बुद्रुक येथे शॉक लागून दोन म्हशींचा मृत्यू, दीड लाखांचे नुकसान

 

म्हैस

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

      बुक्कीहाळ बुद्रुक (ता. चंदगड) येथे तुटलेल्या वीज तारांचा शॉक लागून दोन म्हैशींचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवार दि. १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी चारच्या सुमारास घडली.

      याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, बुक्कीहाळ बुद्रुक येथील सुरेश लगमाना बच्चेनट्टी हे आपल्या म्हैशी चारण्यासाठी रानात घेऊन गेले होते. सायंकाळी परतीच्या मार्गावर गावालगतच असलेल्या विद्युत डीपीवरील विजेच्या तारा तुटून जमिनीवर पडल्या होत्या. या तारांचा स्पर्श म्हशींना होताच दोन्ही म्हशी तडफडून जागीच गतप्राण झाल्या व काळ्या ठिक्कर पडल्या. बच्चेनट्टी यांनी तात्काळ ग्रामस्थांना जमा करून ही माहिती वीज मंडळ व पशुवैद्यकीय अधिकारी यांना कळवली. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी पंचांसमक्ष घटनेचा पंचनामा केला. यातील एक म्हैस मुऱ्हा तर दुसरी गवळट जातीची होती. दुभत्या व प्रत्येकी ८० हजार किमतीच्या दोन म्हैशी क्षणात नाहीशा झाल्यामुळे गरीब सुरेश बच्चेनटी यांचे दीड लाखापेक्षा अधिक नुकसान झाले. त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून याची वीज वितरण कंपनीने तात्काळ नुकसान भरपाई करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.No comments:

Post a Comment