चंदगड येथील न. भु. पाटील ज्युनिअर कॉलेजच्या दोन विद्यार्थीनी इन्स्पायर्ड शिष्यवृत्तीसाठी पात्र, ४ लाख शिष्यवृत्ती जाहीर - चंदगड लाईव्ह न्युज

02 September 2021

चंदगड येथील न. भु. पाटील ज्युनिअर कॉलेजच्या दोन विद्यार्थीनी इन्स्पायर्ड शिष्यवृत्तीसाठी पात्र, ४ लाख शिष्यवृत्ती जाहीर

कु. पुजा गणपती पाटील

कु. नमिता नारायण मोटर


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        न.भु . पाटील ज्युनि . कॉलेज चंदगड येथील  कु. पूजा गणपती पाटील व कु.नमिता नारायण मोटर  या विद्यार्थिनीनी अनुक्रमे  एच.एस.सी. बोर्ड परीक्षेत विज्ञान शाखेत अनुक्रमे ९६ % व९५ %  गुण मिळवून उज्ज्वल यश संपादन केले. या दोन  विद्यार्थिनीना भारत सरकार मार्फत पोस्ट ग्रॅज्यूएटपर्यंत सलग ५ वर्षे  दरवर्षी रू ८०,००० प्रमाणे शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य आर. आय. पाटील उपप्राचार्य ए. जी. बोकडे, पर्यवेक्षक एस. जी. सातवणेकर यांचे प्रोत्साहन लाभले. तर विद्या संकुलातील सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्य आर. आय. पाटील यानी या गुणवंत विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.


No comments:

Post a Comment