आग्रा ते पारगड या शिवज्योतीच्या प्रवासाची किल्ले पारगडावर सांगता - चंदगड लाईव्ह न्युज

03 September 2021

आग्रा ते पारगड या शिवज्योतीच्या प्रवासाची किल्ले पारगडावर सांगता

 

चंदगड येथे प्रेरणा ज्योतीचे दर्शन घेताना नगराध्यक्षा सौ प्राची काणेकर, पं.स.सदस्य दयानंद काणेकर, संभाजीराव देसाई, ॲड संतोष मळविकर आदी

चंदगड / प्रतिनिधी :-- 
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्रा येथून सुटका झालेल्या घटनेला ३५५ वर्षे पूर्ण झाली आहेत चंदगड तालुक्यात प्रेरणा ज्योतीचे मोठ्या उत्साहापूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले .

 आग्रा - राजगड ते पारगड या शिवज्योत प्रवासाची आज किल्ले पारगडावर सांगता झाली . दुपारी अडीचच्या सुमारास शिवज्योत घेऊन शिवप्रेमी येथे दाखल झाले . जिल्हाप्रमुख विजय देवणे ,उपजिल्हाप्रमुख प्रभाकर खांडेकर , ॲड संतोष मळवीकर यांच्या हस्ते ज्योतीचे पूजन झाले . नगराध्यक्षा प्राची काणेकर ,उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला ,प स सदस्य दयानंद काणेकर  संग्रामसिंह कुपेकर , प्रा.सुनील शिंत्रे , संभाजीराव देसाई आदींनी शिवज्योतीचे दर्शन घेतले ,ठिकठिकाणी सुहासिनींनी औक्षण केले . त्यानंतर ज्योत पारगडकडे रवाना झाली . सायंकाळी पाचच्या सुमारास गडावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर प्रवासाची सांगता झाली . रघुवीर शेलार व मावळ्यांच्या वंशजांच्या उपस्थितीत  हा कार्यक्रम झाला.No comments:

Post a Comment