आग्रा - राजगड ते पारगड या शिवज्योतीचे नेसरी येथे स्वागत - चंदगड लाईव्ह न्युज

03 September 2021

आग्रा - राजगड ते पारगड या शिवज्योतीचे नेसरी येथे स्वागत

नेसरी येथील सरसेनापती प्रतापराव गुजर स्मारकावर शिवज्योतीचे पूजन करताना सौ.ग॔धालीदेवी कुपेकर बाजूला संग्रामसिंह कुपेकर वांईगडे, सरपंच साखरे आदी

चंदगड/प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्रा येथून सुटका झालेल्या घटनेला ३५५ वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ आणलेल्या प्रेरणा ज्योतीचे नेसरी येथे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले .शिवसेनेचे संघटक संग्रामसिंह कुपेकर व सौ गंधालीदेवी कुपेकर यांनी सरसेनापती प्रतापराव गुजर पुतळ्या जवळ ज्योतीीचे स्वागत केले.
        यावेळी जिल्हाप्रमुख  विजय देवणे, प्रा सुनील शिंत्रे , नेसरी सरपंच आशिष साखरे,प्रकाश दळवी,कृष्णराव वाईंगडे,हिल राईड चे प्रमुख प्रमोद पाटील,आनंद मटकर, तानाजी पाटील,लक्ष्मण शिंगटे, राजू यादव,दयानंद बोरगल्ली,प्रशांत नाईक,मज्जीद वाटंगी,मज्जीद मुजावर, विलास हल्याळी, अस्लम बागवान,प्रतीक क्षीरसागर, यशवंत देसाई,संजय कांबळे,युवराज दळवी संतोष शिंदे,अण्णापा नाईक,यांच्या सह सरसेनापती चौक,नेसरी येथे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment