अडकूर येथे चंदगड पोलिसाकडून आढावा बैठक - चंदगड लाईव्ह न्युज

01 September 2021

अडकूर येथे चंदगड पोलिसाकडून आढावा बैठक

अडकूर ग्रामस्थांच्या वतीने पो. नि. बी. ए. तळेकर यांचे स्वागत करताना जयंत अडकुरकर.

अडकूर / सी. एल. वृत्तसेवा

          अडकूर (ता. चंदगड) येथे गणेशोत्सव सण २०२१ च्या निमित्ताने चंदगड पोलीस ठाण्याचे वतीने मार्गदर्शन व आढावा बैठक आयोजित केली होती. यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साजरा सण साजरा करताना कोणती खबरदारी घ्यावी. गावात कोरोनाला रोखण्यासाठी काय करावे. प्रशासनाची कशी मदत करावी याविषयी माहीती देण्यात आला. 

                                                  जाहिरात

जाहिरात

           या बैठकीस अडकूर पंचक्रोशी मधील सर्व गणेश मंडळांचे अध्यक्ष व अडकूर मधील मान्यवर  जयंत  अडकुरकर, जगन्नाथ इंगवले, वैजनाथ शिंदे, नामदेव आपटेकर, राजाराम घोरपडे, सतीश पवार, अनिल देसाई, अनिल कांबळे, तानाजी कांबळे पोलीस पाटील उपस्थित होते. या प्रसंगी पोलीस निरीक्षक बी. ए. तळेकर, पोलीस उपनिरीक्षक श्री. गणेशकर यांचा जयंत अडकूरकर यांच्या हस्ते पंचक्रोशीच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गणेशोत्सव समारंभ कोरोणा नियमांचे पालन करून साजरा करण्याचे आवाहन पो. नि. तळेकर यांनी केले.

No comments:

Post a Comment