चंदगड तालुक्यातील एका वाहन चालकाची मूलगी रितिशा झाली सीए - चंदगड लाईव्ह न्युज

13 September 2021

चंदगड तालुक्यातील एका वाहन चालकाची मूलगी रितिशा झाली सीए

 

रितिशा

तेऊरवाडी / एस .के. पाटील
कमळ जसे चिखलात उमलते तसे  गुणवत्ता सिद्ध करायला चांगली परिस्थितीच लागते असे  नाही . तेऊरवाडी ( ता. चंदगड ) येथील शिवाजी हेडोळे या वाहनचालकाची मुलगी चक्क सीए परिक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाल्याने  हम भी किसिसे कम नही हे दाखवून दिले .
      येथील शिवाजी हेंडोळे मुंबईला गेल्या अनेक वर्षापासून टॅक्सी चालवत होते . आता ते एका बँकेत वाहन चालवण्याचे काम करतात . कांदिवलीतील १०x१० च्या खोलीत राहणाऱ्या शिवाजी व सौ . सरिता यांची रितिशा ही मुलगी लहानपणापासूनच अभ्यासात  रममान व्हायची . आई - वडीलांचे कष्ट पाहून ती नेहमी हतबल होत असे . हि परिस्थिती बदलायची असेल तर आपण सीए व्हायचे हे स्वप्न उराशी बाळगून अभ्यासाला लागली . दिवासभर ऑफिसमध्ये कामाला जायचे मग घरी येऊन अभ्यास करायचा  .त्यात दोन वर्ष कोरोणा असल्याने परिक्षा होत नव्हत्या . याचा मनावर तणाव असतानाही अखेर जुलै महिन्यात परिक्षा झाली आणि आज त्या सीए परिक्षेचा निकाल लागला . यामध्ये रितिशा उत्तीर्ण झाल्याने तेऊरवाडी ग्रामस्थांच्या आनंदाला पारावार उरला नाही . गावातील पहीली  सीए होण्याचा मान या मराठमोळ्या रितिशाने पटकावला.

कुं . रितिशा -
यशस्वी होण्यासाठी परिस्थिती आडवी येत नाही. कठोर परिश्रम,  जिद्द व संयम  असणे खूप गरजेचे आहे. यशस्वी व्हायचे असेल आपले स्वप्न मोठे ठेवा, शिक्षकाकडून योग्य ते मार्गदर्शन घ्या  व एकदा निवडलेल्या क्षेत्राशी प्रामाणिकपणे कष्ठ करत राहिल्यास उज्वल यश मिळते  .माझ्या यशासाठी माझ्या आईवडोलांचे व शिक्षकांचे खूप मोठे सहकार्य लाभले असून चंदगड तालूक्यातीत मलांनीही या परिक्षेकडे  एक संधी  म्हणून पहावे. यासाठी अहोरात्र  कष्ट करत राहिले तर यश कोणीच रोखू शकत नसल्याचे मनोगत कु . रितिशा हिने सी .एल. न्यूज प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले .


2 comments:

जोशी गुरुजी said...

चंदगडी डंका देशभर गाजवला रितिशाने

Unknown said...

खूप खूप अभिनंदन रितिशा.या पुढे ही असेच उज्ज्वल यश लाभो हि सदिच्छा.

Post a Comment