कुदनूरला प्रथमेश रेडेकरच्या वाढदिवसानिमित्य दुग्ध व्यवसाय मार्गदर्शन व कार्यशाळा - चंदगड लाईव्ह न्युज

13 September 2021

कुदनूरला प्रथमेश रेडेकरच्या वाढदिवसानिमित्य दुग्ध व्यवसाय मार्गदर्शन व कार्यशाळा

 

तेऊरवाडी / सी .एल. वृत्तसेवा

आपल्या मुलाच्या वाढदिवसासाठी लाखो रुपयांचा चुराडा करणारे अनेक जन आहेत . पण या सर्वाला फाटा देत चि . प्रथमेश याचा वाढदिवस मात्र शेतकऱ्यांसाठी दुग्ध व्यवसाय मार्गदर्शन व कार्यशाळेचे आयोजन करून करण्याचा निर्णय कुदनूर (ता . चंदगड ) येथील राजू रेडेकर यानी घेतला आहे . बुधवार दि .१५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता श्री सिद्धेश्वर सेवा सोसायटी हॉलमध्ये अनेक दुध संघांचे माजी कार्यकारी संचालक व विकास बिझनेस कन्सल्टन्सी गडहिंग्लजचे चेअरमन एस.डी. मोरे यांचे विविध विकास योजना व अनुदान पद्धत , बॅक कर्ज प्रकरण , दुध उत्पादनातील वाढ आदि निषयावर व्याख्यान होणार आहे . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संग्राम कुपेकर असणार आहेत . प्रमुख पाहूणे म्हणून जि.प. सदस्य 

कल्लापा भोगण, विलास पाटील, डे .सरपंच नामदेव कोकितकर व परिसरातील सर्व गावांचे सरपंच उपस्थित राहणार आहेत. यावेळी अखलाख मुजावर यांचा सत्कार करण्यात येणार आहे . तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन राजू रेडेकर यानी केले आहे.No comments:

Post a Comment