श्री हरिकाका यांच्या आशीर्वादाने शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी ! - डॉ डी वाय पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

13 September 2021

श्री हरिकाका यांच्या आशीर्वादाने शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी ! - डॉ डी वाय पाटील

श्रीहरिकाका गोसावी मठात पीठाधीश डॉ आनंद महाराज यांच्या हस्ते डॉ डी वाय पाटील यांचा सत्कार


तेऊरवाडी / सी .एल. वृत्तसेवा

हत्तरगी ( जि. बेळगाव) येथील पुरातन श्री हरिकाका गोसावी ऋग्वेदी मठास बिहारचे माजी राज्यपाल , शिक्षण तज्ज्ञ डॉ डी .वाय .पाटील यांनी भेट दिली .यावेळी पीठाधीश डॉ आनंद महाराज गोसावी यांच्या हस्ते मठाचे वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी डी. वाय. पाटील यांनी आनंद महाराज यांचे आशीर्वाद घेतले.

यावेळी बोलताना डी. वाय. पाटील म्हणाले , आपल्या शैक्षणिक , आध्यात्मिक जडणघडणित आपले गुरू हरिकाका महाराज यांचा आशीर्वाद राहिल्याने गेल्या तीन दशकात डी वाय पाटील विद्यापीठ आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचले असून त्याचा नावलौकिक सर्व दूर पोहचला आहे . हरिकाका यांच्या आशीर्वादाने शैक्षणिक क्षेत्रात भरीव कार्य करता आले, याचे समाधान वाटते असे स्पष्ट केले.

श्री हरिकाका गोसावी ऋग्वेदी भागवत मठ हतरगी जिल्हा बेळगाव येथे पीठाधीश डॉ आनंद उर्फ नरसिंह एकनाथ गोसावी यांच्या हस्ते बिहारचे राज्यपाल डॉ. डी वाय पाटील यांचा सत्कार करण्यात आला .

 यावेळी श्रीमती सुमित्रादेवी एकनाथ गोसावी ,चारुदत्त गोसावी, डॉ. प्रा. सुनील देसाई , बाळ म्हडगुत , सयाजी पाटोळे , गोपाळ चपणे ,यांच्यासह हरिभक्त उपस्थित होते.No comments:

Post a Comment