दाटेत होणार ई - ग्रामची सुरुवात, जिल्हयातील पहिलाच प्रयोग - चंदगड लाईव्ह न्युज

13 September 2021

दाटेत होणार ई - ग्रामची सुरुवात, जिल्हयातील पहिलाच प्रयोग

घनश्याम पाऊसकर
तेऊरवाडी / सी .एल. वृत्तसेवा
आपला खरा देश आज सुध्दा गावगाडयातच अडकला आहे. आजच्या ऑनलाईनच्या काळात फोन, रेंज इ. अनेक समस्या गावगाड्यातील लोकांसमोर आहेत.सरकारच्या अनेक योजनांपासून गावातील लोक अनभिज्ञ आहेत. त्या योजना त्यांच्या पर्यत पोहचल्याच नाहीत. हीच समस्या ओळखून दाटे येथील घनश्याम पाऊसकर (मंत्रालयीन कक्ष अधिकारी) यांनी गावातील सुशिक्षीत तरूणांना एकत्र करून रयत सेवा फौंडेशन ची स्थापना केली. फौंडेशनमार्फत  लक्ष्मीनारायण ई - ग्राम केंद्राचे उद्घाटन शुक्रवार दि. १७ रोजी होणार आहे
' बेळगाव - वेंगुर्ला रस्त्यावरील दाटे गाव चर्चेत राहत ते म्हणजे दरवर्षी येणाऱ्या महापुरामुळे. रस्ता, नदीकाठावर गाव असून गेली कित्येक वर्षे राजकिय कारणामूळे गावचा विकास झाला नाही. पण आता गावातील तरूण जागा झाला आहे.ई ग्रामच्या माध्यमातून गावातील प्रत्येक व्यक्तीला माफक दरात घरपोच ऑनलाईन सेवा देण्याचा मानस आहे. ' अशी माहिती रयत सेवा फौंडेशनचे मार्गदर्शक घनश्याम पाऊसकर यांनी सी .एल. न्यूजशी बोलताना सांगीतली.

No comments:

Post a Comment