गौराई आली सोनपावली, चंदगड तालूक्यात गौराईचे उत्साहात पूजन - चंदगड लाईव्ह न्युज

13 September 2021

गौराई आली सोनपावली, चंदगड तालूक्यात गौराईचे उत्साहात पूजन

 

अडकूर (ता. चंदगड) येथे गौराईला घरी आणताना युवती

तेऊरवाडी / एस. के. पाटील
संपूर्ण महिला वर्गाचा सर्वात आनंदी व उत्साहाचा असणारा गौरी पुजन सन मोठ्या आनंदाने व उत्साहाने भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. सोनपावलानी आलेल्या या गौराईचे सर्वच महिला वर्गाने मनोभावे स्वागत केले.
चंदगड तालूक्यात सर्वच गावात नटून -थट्रन नऊवारी साडी नेसून अगदी लहान मूलीपासून ते महाविद्यालयीन तरूणी व नवविवाहीतानी या गौराईच स्वागत करून तीची  मनोभावे गणपती जवळ स्थापना केली . यावेळी अनेक गावात माहिलांनी पारंपारीक गौरी गिते गात फेर धरला होता. तोरण बांधलय दारोदारी , गौराई आलेय आमच्या घरी , माझ्या गौराईला गुंफिल्या फुलांच्या माळा , माझा मुंफूनी बांधीन तिच्या गळा असी गाणे गात पारंपारीक संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न केला .
एकंदरीत चंदगड तालूक्यात गौराईचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले .


No comments:

Post a Comment