रविंद्र पाटील यांना आंतरराज्य शैक्षणिक सेवा पुरस्काराने सन्मानित, शिक्षक दिनी चिक्कोडीत पुरस्कार प्रदान - चंदगड लाईव्ह न्युज

05 September 2021

रविंद्र पाटील यांना आंतरराज्य शैक्षणिक सेवा पुरस्काराने सन्मानित, शिक्षक दिनी चिक्कोडीत पुरस्कार प्रदान

रवींद्र पाटील यांना आंतरराज्य शैक्षणिक सेवा पुरस्कार प्रदान करताना गुलबर्गा जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. मेघण्णावर, बाजूला माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर, सांगली महापौर सुर्यवंशी, उद्योगपती सुरेशदादा पाटील व अरविंद घट्टी

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

            चिक्कोडी येथील नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन व हेल्थ अँड नेचर डेव्हलोपमेंट सोसायटी बेळगाव यांच्यावतीने नुकताच आंतरराज्य पुरस्कार वितरण सोहळा माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर यांच्या अध्यक्षते खाली उत्साहात संपन्न झाला. शिकक्ष दिनाचे औचित्य साधून पुरस्कार प्रदान करण्यात आले. सीमाकवी व तंज्ञस्नेही रवींद्र पाटील यांना आंतरराज्य शैक्षणिक सेवा पुरस्कार प्रदान करताना गुलबर्गा जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. मेघण्णावर यांच्या हस्ते देण्यात आला.

          यावेळी माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर , सांगली महापौर सुर्यवंशी , उद्योगपती सुरेशदादा पाटील ,अरविंद घट्टी व परशुराम वडर व्यासपिठावर उपस्थित होते. रविंद्र पाटील सध्या मराठी विषयाचे सहा. शिक्षक म्हणून राजर्षी शाहू माध्यमिक विद्यालय शिनोळी बु ता. चंदगड जि. कोल्हापूर येथे २० वर्षे कार्यरत आहेत. त्यांचे गाव बेळगाव तालुक्यातील कुद्रेमानी आहे. 

        सीमाभागात मराठीची होणारी गळचेपीचा उद्रेक त्यांनी थेट *बडोदा येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या काव्यमैफिलीत 'लढा ' या कवितेतून अन्याय मांडून साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. त्याच व्यासपीठावर त्यांना सीमाकवी म्हणून जाहीर केले*. हाती घेतलेल्या कामात स्वतःला झोकून देणे हा त्यांचा स्वभाव, त्यामूळेच त्यांच्याकडे अनेक पदे चालून आली आहेत. ते सध्या

*राज्याध्यक्ष - अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद कर्नाटक राज्य*

*जिल्हाध्यक्ष*- आविष्कार फौंडेशन भारत बेळगाव शाखा

*तालुका समन्वयक - चंदगड तालुका मराठी अध्यापक संघ*

*कोल्हापूर जिल्हाउपाध्यक्ष -नँशनल युनियन आँफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र* 

त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना आजतागायत अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघाचा

*कोजिम प्रेरणा पुरस्कार* सन्मानीत आहेत .

 *दै. जनमतचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार - २०१९*

*राजा शिवछत्रपती पारगड - चंदगड सन्मान - २०१९*

*काव्य कला गौरव पुरस्कार, पुणे -२o१८*

*आदर्श पत्रकार पुरस्कार , सासवड पुणे - २०१९*

*आविष्कार फौंडेशनचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार - २०२०*

*बेळगाव केएलई वेणुध्वनी एफ . एम. रेडिओ केंद्रावर तीन वेळा मुलाखत व कार्यक्रमात सहभाग*

*सीमाकवी, पत्रकार, तंत्रस्नेही शिक्षक , समालोचक ,निवेदक तसेच सामाजिक , सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यात कार्यरत*

*चंदगड तालुका मराठी अद्यापक संघाकडून हस्ताक्षर स्पर्धा, निबंध स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, उखाणे स्पर्धा, पत्रलेखन स्पर्धा, सामान्य तसेच ऑनलाईन गुगलमीट मार्ग दर्शन , चर्चासत्र यांचे नेटके नियोजन करण्यात सरांचा हातखंडा आहे*.

सर स्वतः तंत्रस्नेही असून आपल्या सहकाऱ्यांना त्याचा फायदा व्हावा म्हणून बेळगाव येथे दोन दिवसांचे तंत्रस्नेही शिबीर यशस्वीपणे भरविले.

*२५ जुलै रोजी झालेल्या अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या ऑनलाईन साहित्य संमेलनात खासदार संजय राऊत, संमेलनाध्यक्ष श्रीराम पचिंद्रे, स्वागताध्यक्ष शरद गोरे , कवी संमेलनाध्यक्ष आनंद शेंडे , आप्पासाहेब गुरव ,शिवसंत संजय मोरे , ॲड.सुधीर चव्हाण अशा दिग्गजांची मांदियाळी भरवून माय मराठीचा ऑनलाईन लोकोत्सव भरवणाऱ्या रविंद्र पाटील सरांच्या कार्यास लाख लाख सलाम* !

       रविंद्र पाटील यांना आंतरराज्य शैक्षणिक सेवा पुरस्कार प्राप्त झालाबद्दल रविंद्र पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

   या पुढेही आपल्या हातून असेच अभिनव उपक्रम, नवोपक्रम, नवनवीन विचारप्रवाह, काव्य, साहित्य निर्माण होण्यासाठी, घडण्यासाठी परमेश्वर आपल्याला उदंड आयुष्य, सामर्थ्य व शक्ती देवो. आपली शिक्षण क्षेत्रातील सेवा मैलाचा दगड ठरो अशी ईश्वरचरणी प्रार्थना सामाजिक व शैक्षणिक कार्यातील मित्र परिवार कडून होत आहे.

No comments:

Post a Comment