![]() |
अखलाक मुजावर |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
महागाव (ता. गडहिंग्लज) अखलाकभाई हुसेन मुजावर यांची शिवसेना प्रणित शिवसहकार सेनेच्या गडहिंग्लज तालुका संघटक पदी निवड झाली आहे.
हिंदुत्ववादी शिवव्याख्याते म्हणून ते परिचित आहेत. शिवसेनेची मुलुख मैदान तोफ समजले जाणारे अखलाक भाई गेली ३० वर्षे कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता शिवसेना पक्षाची ध्येय धोरणे समाजात तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी योगदान देत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन पक्षाने त्यांच्यावर ही संघटनात्मक जबाबदारी दिली आहे. शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार निवडीचे पत्र मुंबई येथे शिल्पा अतुल सरपोतदार (अध्यक्ष- शिव सहकार सेना महाराष्ट्र) यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान केले. यावेळी अरुण दुधवडकर, नितीन बानगुडे- पाटील, दगडू सपकाळ, प्रदीप खोपडे, दिनकर जाधव, अशोक निकम आदी शिवसेना नेते तसेच पांडुरंग चौगुले मामा, चंद्रकांत नेवरेकर, प्रसाद चिंचणेकर, खालिद मुजावर यांची उपस्थिती होती. याकामी मुजावर यांना जिल्हाप्रमुख विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख प्रभाकर खांडेकर, चंदगड विधानसभा संघटक संग्रामसिंह कुपेकर, संपर्कप्रमुख प्रा सुनील शिंत्रे आदींचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment