आमदार आबीटकर यांची चंदगड-आजरा तालुका चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी घेतली भेट, विविध विषयांवर केली चर्चा - चंदगड लाईव्ह न्युज

06 September 2021

आमदार आबीटकर यांची चंदगड-आजरा तालुका चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी घेतली भेट, विविध विषयांवर केली चर्चा

 

गारगोटी येथे आम.प्रकाश आबिटकर याची महाराष्ट्र राज्य खाजगी शाळा चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेच्या आजरा, चंदगड येथील कर्मचाऱ्यांनी भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले.

 चंदगड / प्रतिनिधी 
महाराष्ट्र राज्य खाजगी शाळा चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेच्या आजरा, चंदगड येेथील कर्मचाऱ्यांनी आमदार प्रकाश आबिटकर यांची गारगोटी येथे भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी मागण्यांचे निवेदन आम.आबिटकर यांना देण्यात आले.
जुनी पेन्शन व सरळ भरती , व सेवाजेष्ठता डावलून काही नेमणका झाल्या आहेत अशा विविध प्रश्नांवर चर्चा करून निवेदन देण्यात आले.यावेळी शासन दरबारी संघटनेच्या प्रलंबित कामासाठी आपण आवाज उठवून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन आम.आबीटकर यानी दिले.
               या वेळी कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष अजित गणाचारी आजरा तालुका अध्यक्ष विजय कोंडूसकर उपाध्यक्ष संतोष व्हनबट्टी, सचिव गोपाळ गडकरी , संदीप कुंभार, आनंदा कांबळे, प्रकाश प्रभू, विजय कांबळे, बाळू नाईकवाडे , शांताराम गावडे , अजित कांबळे , सुधाकर गणपते , धनाजी चाळके, मारूती बुरूड , इत्यादी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment