चंदगड येथील दुंडगेकर शिक्षक पतसंस्थेला १ कोटी ४ लाखाचा नफा, ऑनलाईन वार्षिक सभेत माहीती - चंदगड लाईव्ह न्युज

05 September 2021

चंदगड येथील दुंडगेकर शिक्षक पतसंस्थेला १ कोटी ४ लाखाचा नफा, ऑनलाईन वार्षिक सभेत माहीती

चंदगड येथील दुंडगेकर शिक्षक पतसंस्थेच्या वार्षिक सभेला उपस्थित संचालक.


चंदगड /  सी. एल. वृत्तसेवा

          चंदगड येथील प्रा. नामदेवराव दुंडगेकर चंदगड तालुका शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित चंदगड या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक ०५.०९.२०२१ रोजी ऑनलाईन झुम अॅपदवारे संस्था कार्यालय चंदगड येथे संपन्न झाली.

           सभेच्या सुरूवातीला दिवंगत सभासदांना श्रध्दाजंली अर्पण करून सभेच्या कामकाजाला सुरूवात करण्यात आली. सभेच्या प्रास्ताविकामध्ये चेअरमन शिवाजी कृष्णा हरेर सर यांनी संस्थेच्या प्रगतीचा. आलेख सभासदांसमोर मांडला. संस्थेला चालू आर्थिक वर्षात १०४२४९४२/-रूपयाचा नफा झालेला असून सभासदांना १४ टक्के दराने लाभांश वाटप करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. संस्थेमार्फत सभासद कर्ज मुक्ती योजनेमधून ३३६८८२२/- रूपयाची कर्ज माफी करणेत आली तसेच अहवाल सालात मयत झालेल्या. ५ सभासदांच्या वारसांना प्रत्येकी ५१०००/- रूपयाची आर्थिक मदत देणेत आली. तसेच संस्थेने कर्जमर्या देमध्ये वाढ केलेली असुन एकुण कर्जमर्यादा ५० लाख केलेली आहे तसेच संस्थेने दि. ०१.१०.२०२१ पासुन नियमीत कर्जावरील व्याज दर ११ टक्के वरून १०.५ टक्के केलेला आहे.

         ऑनलाईन सभेमध्ये बहुसंख्य सभासदांनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन एन. एल. कांबळे यांनी केले. आभार श्रीकांत पाटील यांनी मानले. अहवाल वाचन चिटणीस  प्रदिप कृष्णा  कुंभार यांनी केले. सभेला सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment