सेवानिवृत्त मुख्याध्यापक आनंदा शिंदे यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

12 September 2021

सेवानिवृत्त मुख्याध्यापक आनंदा शिंदे यांचे निधन

 

आनंदा शिंदे

अडकूर /प्रतिनिधी 

     नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक आनंदा सावळा शिंदे (वय वर्षे ७६)यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. शिंदे गुरुजी जुन्या पिढीतील शिक्षक होते. शिक्षण क्षेत्रामध्ये गुणवंत विद्यार्थी घडविण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली,सुन व नातवंडे असा मोठा परिवार आहे.शिंदे गुरुजी यानी खारेपाटण,राधानगरी,हातकणंगले,तळसंदे,पट्टणकोडोली,चावरे आदी ठिकाणी त्यांनी अध्यापक ते मुख्याध्यापक असे ज्ञानदानाचे काम प्रामाणिकपणे पार पाडले. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.त्यांचे अनेक विद्यार्थी उच्चविद्याविभूषित झाले आहेत.

इचलकरंजी येथील स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्थेचे माजी मुख्याध्यापक शिवाजी शिंदे यांचे ते वडील होत.
No comments:

Post a Comment