तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत पूणे मतदार संघाचे शिक्षक आमदार प्रा.जयंत आसगावकर यांचे मार्फत चंदगड तालुक्यातील पहिल्या टप्यात ११ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप तसेच दि न्यू इंग्लिश स्कूल व न. भू. पाटील ज्यू. कॉलेजचंदगड येथील अटल टिंकरिंग लॅबचे उद्वघाटन होणार आहे. यानिमित्य शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगांवकर यांचा सोमवार दि. ४ ऑक्टोबर रोजी चंदगड तालूका दौरा करणार आहेत.
या कार्यक्रमाला अँड. एस.आर. पाटील, विद्याधर गुरबे, विष्णू खाडे, विश्वजीत खाडे उपस्थित राहणार आहेत. तरी या सोहळ्यास शिक्षण प्रेमीनी उपस्थित रहावे असे अवाहन प्राचार्य आर. आय. पाटील यानी केले आहे.
No comments:
Post a Comment