स्वच्छता अंगिकारणे हिच खरी गांधी जयंती - प्राचार्य आर. आय. पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

02 October 2021

स्वच्छता अंगिकारणे हिच खरी गांधी जयंती - प्राचार्य आर. आय. पाटील

दि न्यू इंग्लिश स्कूल व न. भु. पाटील ज्यु.कॉलेजच्या शिक्षकांनी केली  स्वच्छतारुपी गांधी जयंती

परिसर स्वच्छता करताना.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       खरा भारत हा खेडयात आहे. खेडयाकडे चला असा मंत्र गांधीजीनी तरूणांना दिला.गांधीजीनी स्वच्छ भारताचे स्वप्न पाहिले.स्वच्छतेचे बाळकडू आपण विद्यार्थ्याना कृतीतून दिले तर त्याचा विधायक परिणाम होतो. गांधी जयंतीचे औचित्य साधून दि न्यू इंग्लिश स्कूलच्या वीस शिक्षकांनी व न. भु. पाटील ज्यु.कॉलेजच्या सत्तर प्राध्याकांनी  सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत स्वच्छतारुपी गांधी जयंती साजरी केली. 

कार्यक्रमात बोलताना प्राचार्य आर. आय. पाटील

        एरव्ही झाडू, घमेले, बुट्टी हे साहित्य शाळेच्या शिपायांच्या हातात दिसतं. पण आज गांधीजयंतीच्या निमित्ताने विद्यालयातील शिक्षकांनी शाळेच्या वर्गखोल्या, शाळेचा परिसर स्वच्छ केला.कार्यक्रमाच्या सुरवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य आर.आय. पाटील होते.पाहुण्यांची ओळख प्रा. मनिषा आमनगी यांनी करून दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय साबळे यांनी केले.गांधीच्या जीवनातून कार्यपध्दतीतून, आचार विचारातून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. गांधीजीची दिनचर्या ही स्वच्छतेवर आधारलेली होती.

        आपला परिसर, गाव, देश स्वच्छ करणे हीच खरी गांधी जयंती आहे ' असे प्रतिपादन प्राचार्य आर.आय. पाटील यांनी केले.कार्यक्रमाला एन.डी. देवळे, प्रा.बी.डी. मोरे, आर.पी. पाटील, टी. एस. चांदेकर, एम.व्ही. कानूरकर, टी. टी. बेरडे , एस. व्ही. हदगल व शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अर्चना रेळेकर तर आभार बी.आर.चिगरे यांनी मानले.
No comments:

Post a Comment