पत्नीला वाचवण्याची कोरोना योद्ध्याची लढाई अखेर अपयशी, सुमन यांचा उपचारादरम्यान मृत्यू, चंदगड तालुक्यातील घटना - चंदगड लाईव्ह न्युज

02 October 2021

पत्नीला वाचवण्याची कोरोना योद्ध्याची लढाई अखेर अपयशी, सुमन यांचा उपचारादरम्यान मृत्यू, चंदगड तालुक्यातील घटना

फाटकवाडी येथील सुनील वायदंडे यांच्या पत्नी सुमन यांचा उपचारादरम्यान मृत्यू

सुमन वायदंडे

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

            फाटकवाडी (ता. चंदगड) येथील कोरोना योद्ध्या सुनील वायदंडे यांची पत्नीला वाचवण्याची लढाई अखेर अपयशी ठरली. त्यांची पत्नी सुमन मोटारसायकलवरून पडून गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात गेल्या दोन महिन्यांपासून पत्नीवर उपचार सुरू होते. मात्र, त्यांची मृत्यूशी झुंज अखेर संपली. तिच्या पश्चात नवरा, दोन मुलगे, सासू सासरे, दिर जाऊ असा परीवार आहे. चंदगड येथील कोरोना सेंटरमध्ये रुग्णांची सेवा करणाऱ्या सुनील यांच्यावर हा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आर्थिक स्थिती बेताची असल्याने अनेकांनी मदतीचा हात दिला होता. उच्चशिक्षित सुनील चंदगड येथील कोरोना सेंटरमध्ये स्वच्छतेचे काम करीत होते. कोरोना रुग्णांना आधार देणारे त्यांचे शब्द अनेकांसाठी आधार बनले होते. मात्र, आता त्यांचा आधार गेलाय. कोरोना सेंटर येथील रुग्णसंख्या कमी झाल्याने त्यांचे काम थांबले. त्यानंतर लहान मुलगा आजारी पडल्याने ते चंदगड ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांकडे घेऊन आले होते. सोबत पत्नी सुमन होत्या. घरी परत जात असताना सुमन यांचा चालत्या गाडीवरून तोल जाऊन पडल्याने गंभीर जखमी झाल्या. तातडीने त्यांना गडहिंग्लज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुनील यांच्या भावाने आपल्या पत्नीचे तसेच सुमन यांचे मंगळसूत्र विकून प्राथमिक खर्च केला. डोकीला गंभीर दुखापत झाल्याने डॉक्टरांनी त्यांना कोल्हापूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले होते. आर्थिक भार अधिक असल्याने अनेकांनी त्यांना मदत देऊ केली होती. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून उपचार सुरू होते. त्यातून त्या बऱ्या होती हो अपेक्षा होती. मात्र, त्यांची मृत्यूशी झुंज अखेर संपली.
No comments:

Post a Comment