चंदगड न्यायालयात विधी साक्षरता अभियानाचा उद्घाटन, शहरातून फेरी - चंदगड लाईव्ह न्युज

02 October 2021

चंदगड न्यायालयात विधी साक्षरता अभियानाचा उद्घाटन, शहरातून फेरी

              

चंदगड शहरातून काढलेल्या फेरीमध्ये सहभागी झालेले बार असोशिएशनचे सदस्य.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        विधी साक्षरता अभियान अभियानांतर्गत दिवाणी फौजदारी न्यायालय चंदगडच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभियानाचे उद्घाटन सहदिवाणी न्यायाधीश सी. यु. शिपकुले यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या फोटो प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. त्यानंतर चंदगड शहरातून फेरी काढण्यात आली.          

        २  ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर पर्यंत हे अभियान चालणार आहे असे यावेळी मार्गदर्शनपर  बोलताना न्यायाधीशांनी सांगितले. यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष जी. एन. दळवी, पोलीस निरीक्षक बी. ए. तळेकर व  बार असोसिएशनचे सर्व विधीतज्ञ, न्यायालयाचे सर्व कर्मचारी, पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
No comments:

Post a Comment