कोलिक येथे वन्यजीव सप्ताह अंतर्गत जनजागृती, जंगल संरक्षण करण्याचे आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

02 October 2021

कोलिक येथे वन्यजीव सप्ताह अंतर्गत जनजागृती, जंगल संरक्षण करण्याचे आवाहन

कोलीक : जागृतीपर कार्यक्रमात एन. एम. धामणकर, वनरक्षक एम.आय. सनदी, एस. बी. तांबेकर आदी.

कागणी : सी. एल. वृत्तसेवा

         तुडये (ता. चंदगड) वन विभाातर्फे शनिवारी दि. २ रोजी कोलीक (ता.चंदगड) येथे राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह साजरा केला. वन्यजीव सप्ताह हा दरवर्षी 1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान साजरा केला जातो. यानिमित्ताने हा कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी सरपंच संभाजी गावडे होते.                          वनपरिक्षेत्र पाटणे अंतर्गत वनपरिमंडळ अधिकारी एन. एम. धामणकर, वनरक्षक एम. आय. सनदी, एस. बी. तांबेकर यांनी वन्यप्राणी आणि माणूस यांच्यातील संघर्ष, समस्या कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. वन्यप्राण्यांबरोबरच माणूस सुरक्षित कसा राहील, याची खबरदारी घेणे ही काळाची गरज बनली आहे, असे सांगितले.

          एस. एस. बोंद्रे, पी. एम. शिंदे, एम. एम. हुल्ले, एस. ए. गावडे, वनसेवक एन. व्ही. गावडे, एम. के. मुतकेकर , शिक्षक आर. के. पाटील उपस्थित होते. आभार दत्तु गावडे यांनी मानले.


No comments:

Post a Comment