चाळोबा गणेश हत्ती कडून टू-व्हीलरची मोडतोड - चंदगड लाईव्ह न्युज

20 November 2025

चाळोबा गणेश हत्ती कडून टू-व्हीलरची मोडतोड

 

संग्रहित छायाचित्र

आजरा : सी. एल. वृत्तसेवा 

        चाळोबा गणेश हत्ती कडून शिरसंगी (ता आजरा) गावामध्ये नुकसानीचे सत्र सुरूच आहे. बुधवारी दिनांक १९ रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास शिरसंगी (ता आजरा) येथील दयानंद बुडके यांच्या टू व्हीलरची मोडतोड केली. या ठिकाणी वनविभागाचे पथक ही कार्यरत असून शिरसंगी यमेकोंड गावच्या शिवारात वनपथक लक्ष ठेवून आहे. महिनाभरापासून शिरसंगीच्या जंगलामध्ये या हत्तीचा वावर आहे. परिसरातील अनेक विविध पिकांचे त्यांच्याकडून नुकसान सुरू आहे.

No comments:

Post a Comment