चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
गडहिंग्लज येथे बस स्थानकावर वारंवार गळ्यातील दागिने, खिशातील पॉकेट चोरीला जात आहेत. या प्रकारामध्ये ठराविक जणांची टोळी सक्रिय आहे. त्यामुळे प्रवाशांनी गडहिंग्लज सह चंदगड बस स्थानकावरही सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
असाच प्रकार गडहिंग्लज येथील बस स्थानकामध्ये बुधवारी घडला. रमेश गोपाळराव टिकारे (सध्या राहणार पंतनगर घाटकोपर मुंबई व मुळगाव कडगाव तालुका भुदरगड) यांनी आपल्या गळ्यातील चेन बस स्थानकावर सायंकाळी पाच वाजता चोरट्याने लांबवली असल्याबाबत गडहिंग्लज पोलिसात तक्रार दिली आहे टीकारे हे संकेश्वर येथे जाण्यासाठी बुधवारी सायंकाळी गडहिंग्लज बस स्थानकात आले. सायंकाळी ५:४५ वाजता ते संकेश्वर बस मध्ये गर्दीतून चढत होते याचवेळी त्यांच्या गळ्यातील चेन हिसकावून लंपास करण्यात आली.
.jpg)
No comments:
Post a Comment