चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
गवसे (ता. आजरा) येथील वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी कारखान्याने यंदा २०२५ ते २०२६ या गाळप हंगामासाठी येणाऱ्या उसाला प्रति मॅट्रिक टन ३,४०० रु. विना कपात दर जाहीर केला आहे. त्याबाबतचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांनी दिली.
याबाबतच्या बैठकीमध्ये कारखान्याचे उपाध्यक्ष सुभाष देसाई, संचालक वसंतराव धुरे विष्णुपंत केसरकर उदयराज पवार जिल्हा बँक प्रतिनिधी सुधीर देसाई संचालक मधुकर देसाई मारुती घोरपडे अनिल फडके दीपक देसाई रणजीत देसाई संभाजी पाटील शिवाजी नांदवडेकर राजेंद्र मुरूकटे राजेश जोशीलकर गोविंद पाटील संचालिका रचना होलम मनीषा देसाई संचालक काशिनाथ तेली संभाजी पाटील अशोक तरडेकर हरिभाऊ कांबळे, कारखान्याचे एमडी एस के सावंत उपस्थित होते.

No comments:
Post a Comment