दाटे येथे रविवार दि. 23 ते 28 नोव्हेंबर अखेर मंदिर वास्तुशांती व धार्मिक कार्यक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

20 November 2025

दाटे येथे रविवार दि. 23 ते 28 नोव्हेंबर अखेर मंदिर वास्तुशांती व धार्मिक कार्यक्रम

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 

        दाटे (ता. चंदगड येथे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ, श्री लिंगदेव, श्री हनुमान, श्री लक्ष्मी व श्री भावेश्वरी देवी यांच्या मंदिरांची वास्तुशांती व मूर्ती, प्राणप्रतिष्ठापना, कळसारोहन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रविवार दिनांक 23 नोव्हेंबर ते शुक्रवार 28 नोव्हेंबर 2025 अखेर गावात वास्तुशांती, कळसा रोहन मिरवणूक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे आयोजन केले आहे. ह भ प डॉ विश्वनाथ पाटील व विठोबा गावडे यांच्या अधिपत्याखाली ग्राम पुरोहित विजयकुमार जोशी व दत्तराज पाटणकर यांच्या पौरोहित्या खाली होणाऱ्या कार्यक्रम व महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर जीर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष उदयकुमार देशपांडे, उपाध्यक्ष विठ्ठल गुरव, सचिव शिवाजी खरुजकर, खजिनदार पुंडलिक गावडे व कमिटीने केले आहे.

   कार्यक्रमाची रूपरेषा थोडक्यात पुढील प्रमाणे रविवार दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी मुहूर्तमेढ, रविवार दिनांक 23 सकाळी देव देवतांना आवाहन, मूर्ती व कळस मिरवणूक, विना पूजन, धान्याधिवास इ. धार्मिक कार्यक्रम व बेळेभाट गावापासून रवळनाथ मंदिर दाटेपर्यंत मूर्ती व कळस मिरवणूक. 

  सोमवार दि. 24 रोजी सकाळी प्रायश्चित विधी, देवता प्रार्थना, गणेश पूजन, पुण्याहवाचन, गोमाता पूजन, कुमारीका पूजन, जलाधिवास आदी धार्मिक कार्यक्रम. रात्री संगीत भजन. 

   मंगळवार दि 25 रोजी काकड आरती, शांती होम, स्नान विधी, मंडप प्रतिष्ठा, देवता स्थापना, शय्याधिवास आदी धार्मिक कार्यक्रम. सायंकाळी प्रा शिवाजीराव भुकेले यांचे कीर्तन.

   बुधवार दि. 26 रोजी सकाळी काकड आरती, प्राकार सिद्धी, मंडप अंतर्गत देवता पूजन, आशीर्वचन व शांती याग. सायंकाळी सुरेश गावडे तुर्केवाडी व अमोल सुळ महाराज फलटण यांचे कीर्तन.

 गुरुवार दि. 27 रोजी सत्व होम, मधुपर्क पूजा, पूर्णाहुती आदी धार्मिक कार्यक्रम, सायंकाळी डॉ. विश्वनाथ पाटील जट्टेवाडी यांचे प्रवचन, ज्योतिबा पाटील कुद्रेमानी व ह भ प ज्ञानेश्वर महाराज कुरुंदवाड यांचे कीर्तन.

    शुक्रवार दि. 28 रोजी दुपारी 12.01 वाजता महाप्रसाद पूजन व महाप्रसाद वाटप होणार असून तत्पूर्वी होणाऱ्या कार्यक्रमास पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, खासदार शाहू महाराज, आमदार शिवाजीराव पाटील, माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील आमदार सतेज पाटील, माजी आमदार राजेश पाटील, संध्यादेवी कुपेकर गोपाळराव पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडणार आहे. भाविकांनी सर्व कार्यक्रम व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन जीर्णोद्धार कमिटी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.


दाटे येथे वास्तुशांती होत असलेले श्री देव रवळनाथ मंदिर व प्रतिष्ठापना होत असलेली श्रींची मूर्ती

No comments:

Post a Comment