![]() |
| उदय महादेव जाधव |
कोवाड : सी एल वृत्तसेवा
मूळचे कुदनूर (ता. चंदगड सध्या रा. शाहूनगर, बेळगाव) येथील रहिवासी व मोदगे ता हुककेरी येथील माध्यमिक विद्यालयाचे निवृत्त शिक्षक उदय महादेव जाधव (वय ६२) यांचे गुरुवारी दि. २० सकाळी ६ वाजता हृदयविकाराने निधन झाले. कागणी (ता. चंदगड) येथील व्ही. के. चव्हाण पाटील हायस्कूलचे मुख्याध्यापक डी. एम. जाधव यांचे ते बंधू होत. त्यांच्यावर मूळगावी कुदनुर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात भाऊ, पुतणे, पुतण्या, पत्नी, चिरंजीव, कन्या, जावई नातू, वहिनी असा परिवार आहे. वडगाव, बेळगाव येथील इंजिनीयर वर्षा जांबोटकर यांचे ते वडील तर सीए विनायक जांबोटकर यांचे ते सासरे होत. रक्षाविसर्जन सोमवारी (दि. २४) सकाळी होणार आहे.

No comments:
Post a Comment