कोल्हापूर जिल्हा परिषदेतर्फे देण्यात येणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज, आचार्य अत्रे पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण, चंदगड तालुक्यातील दोन पत्रकारांना आचार्य अत्रे पत्रकारिता पुरस्कार - चंदगड लाईव्ह न्युज

02 October 2021

कोल्हापूर जिल्हा परिषदेतर्फे देण्यात येणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज, आचार्य अत्रे पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण, चंदगड तालुक्यातील दोन पत्रकारांना आचार्य अत्रे पत्रकारिता पुरस्कार

कोल्हापूर येथे झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते आचार्य अत्रे पत्रकारिता पुरस्कार स्विकारताना दैनिक लोकमतचे  नंदकुमार ढेरे. 


कोल्हापूर / विशेष प्रतिनिधी

        जिल्हा परिषदेच्यावतीने देण्यात येणारे पुरस्कार हे पुरस्कार प्राप्त व्यक्तीसाठी एक नवीन सुरुवात असून यापुढील काळात ही अपेक्षा अधिक उत्कृष्ट काम परस्परांच्या सहकार्याने करावे. कोल्हापूर जिल्हा परिषद ही विकासात्मक कामात राज्यातच नव्हे तर देशात आघाडीवर असली पाहिजे यासाठी प्रत्येकानेच प्रयत्न करावे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत सदस्यांना या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा कायापालट करण्याची मोठी संधी असून या संधीतून त्यांनी तळागाळातील लोकापर्यंत विकास कामे घेऊन जाऊ शकतात असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज (बंटी) डी. पाटील यांनी केले. कोल्हापूर येथे कोल्हापूर जिल्हा परिषदेतर्फे देण्यात येणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज, आचार्य अत्रे पत्रकारिता पुरस्कार व महाआवास योजना पुरस्कारांच्या वितरण प्रसंगी ते बोलत होते.

कोल्हापूर येथे झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते आचार्य अत्रे पत्रकारिता पुरस्कार स्विकारताना दै. पुढारीचे तालुका प्रतिनिधी नारायण गडकरी.

          यावेळी कार्यक्रमात चंदगड तालुक्यातील दैनिक लोकमतचे प्रतिनिधी नंदकुमार ढेरे व दै. पुढारीचे चंदगड तालुका प्रतिनिधी नारायण गडकरी यांना आचार्य अत्रे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

          कार्यक्रमाला ग्रामविकासमंत्री ना. हसन मुश्रीफ, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजीव आवळे, आमदार जयंत आसगावकर, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयवंत शिंपी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, शिक्षण व अर्थ समिती सभापती श्रीमती रसिका पाटील, सभापती बांधकाम व आरोग्य समिती  सभापती  श्रीमती वंदना जाधव, महिला व बाल कल्याण सभापती श्रीमती शिवानी भोसले, समाज कल्याण समिती सभापती श्रीमती कोमल मिसाळ, ज्येष्ठ सदस्य अरुण इंगवले, सदस्य सतीश पाटील, युवराज पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते.
No comments:

Post a Comment