माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांची महागाव येथील 'संत गजानन' ला भेट - चंदगड लाईव्ह न्युज

21 October 2021

माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांची महागाव येथील 'संत गजानन' ला भेट

               

महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजाननला माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी भेट दिल्यानंतर त्यांचे स्वागत करताना महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापक.
                           

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज शिक्षण समूहास माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांचे स्वागत संस्थाध्यक्ष डॉ. ॲड. आण्णासाहेब चव्हाण यांनी केले. 

      यावेळी डॉ. पाटील यांनी प्रस्तावित बीएएमएस हॉस्पिटल व शिक्षण समूहातील इतर शाखेस भेट देऊन माहिती घेतली. डॉ. यशवंत चव्हाण, डॉ. संजय चव्हाण, डॉ. प्रतिभा चव्हाण, डॉ. सुरेखा चव्हाण यांनी शिक्षण समूहातील वैद्यकीय व इतर शैक्षणिक कार्याची माहिती दिली. याबद्दल डॉ. पाटील यांनी  समाधान व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.                                यावेळी सचिव डॉ. बाळासाहेब चव्हाण, डॉ. मंगल मोरबाळे, डॉ. संजय दाभोळे, डॉ. एस. एच. सावंत, डॉ. एस. जी. किल्लेदार, डॉ. अन्सार पटेल, रजिस्टार शिरीष गणाचार्य, विविध विभागातील शिक्षक, कर्मचारी वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment