संजय घोडावत आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर प्रा. जाधव यांची निवड - चंदगड लाईव्ह न्युज

26 October 2021

संजय घोडावत आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर प्रा. जाधव यांची निवड

प्रा. डॉ.  मधुकर जाधव 


चंदगड / प्रतिनिधी 

        हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील इतिहास विषयाचे प्रा.डॉ.मधुकर विठोबा जाधव यांची संजय घोडावत आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्र व मानव्यशास्त्र अभ्यास मंडळावर कुलगुरु नियुक्त सदस्य म्हणून निवड झाली.त्यांचे एकूण ८५ शोधनिबंध प्रकाशित आहेत. मध्ययुगीन शस्त्रे या विषयावर एक पुस्तकही प्रकाशित आहे. प्रतापराव गुजर एक कर्तबगार सरसेनापती या विषयावर युजीसीचा प्रकल्प पूर्ण केला आहे. ते मराठी विश्वकोष, शिवाजी विद्यापीठ बहिस्थ शिक्षण विभागासाठी लेखन करत आहेत. विविध वृत्तपत्रांत, मासिकात, दिवाळी अंकात त्यांचे लेख प्रकाशित होतात. त्यांनी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश, राजस्थान, आंध्रप्रदेश आदी ठिकाणी विविध विषयावर जवळपास ८०० वर व्याख्याने दिली आहेत. ते शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळावरही कार्यरत आहेत. संस्थेचेे मार्गदर्शक संचालक गोपाळराव पाटील, अध्यक्ष अशोक जाधव, उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विशाल पाटील, प्र. प्राचार्य प्रा. पी. ए. पाटील, डॉ. उत्तम जाधव, डॉ. माधव पाटील, डॉ. अरुण भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment