नेहरू युवा केंद्र, कोल्हापूर यांच्या वतीने स्वच्छ भारत अभियान - चंदगड लाईव्ह न्युज

03 November 2021

नेहरू युवा केंद्र, कोल्हापूर यांच्या वतीने स्वच्छ भारत अभियान

स्टिफन इंग्लिश मिडीयम स्कूल, येथे स्वच्छ भारत अभियान हा उपक्रम होताना शाळेचे विद्यार्थी व शिक्षक


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         मौजे चंदगड येथे नेहरू युवा केंद्र, कोल्हापूर यांच्या वतीने स्वच्छ भारत अभियान (Clean India) अनुराग ठाकुर केंद्रीय क्रीडा मंत्री भारत सरकार यांच्या मार्फत संपूर्ण भारतात स्वच्छ भारत अभियान हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नेहरू युवा केंद्र कोल्हापूर यांच्या वतीने चंदगड मधील  स्टिफन इंग्लिश मिडीयम स्कूल, येथे स्वच्छ भारत अभियान हा उपक्रम राबविण्यात आला.

       यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अपूर्वा पाटील, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी त्याचसोबत नेहरू युवा केंद्र समन्वयक अमेय सबनीस हे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment