ढोलगरवाडी छाप्यात २ कोटी ३५ लाखांचे एमडी (ड्रग्ज) जप्त, दोन आरोपी अटक तर मुख्य आरोपी फरारी - चंदगड लाईव्ह न्युज

17 November 2021

ढोलगरवाडी छाप्यात २ कोटी ३५ लाखांचे एमडी (ड्रग्ज) जप्त, दोन आरोपी अटक तर मुख्य आरोपी फरारी

ढोलगरवाडी येथील छाप्यात सापडललेले एमडी हे आम्ल युक्त पदार्थ व कच्चे रसायन


तेऊरवाडी (एस. के. पाटील)

         अँटी ऍसिडिटी सेल, वांद्रे युनिट, मुंबई यांचेकडून ढोलगरवाडी (ता.  चंदगड) जि. कोल्हापूर येथे छापा टाकून मेफेड्रॉन (एमडी) व आम्लयुक्त पदार्थ बनविन्याची फॅक्टरी उघडकीस आणली. यामध्ये दोन आरोपीना अटक करण्यात आले असून यातील मुख्य आरोपी  राजकुमार अर्जुनराव राजहंस फरारी आहे. तर या कारवाईत २ कोटी ३५ लाख ५० हजार रुपयांचे एमडी ड्रग्ज पकडण्यात आले आहे. या प्रकरणात या फार्म हाऊसचा केअर टेकर निखिल रामचंद्र लोहार (वय -२९) व ख्रिस्तिना मॅनलिन उर्फ आयेशा हिला अटक करण्यात आली आहे.

कारवाईमध्ये पकडण्यात आलेल्या आरोपीसोबत तपास अधिकारी

           13 डिंसेंबर 2021  रोजी सकाळी  07.30 वा.  ते ०९.०५ च्या सुमारास ढोलगरवाडी येथे  हा छापा टाकण्यात आला होता . यावेळी  50 ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) हे अम्लीय पदार्थ (अ. कि. रु. 5,00,000/-) (2) एकुन 120 ग्रॅम मेफेड्रॉन (MD) हे आम्लयुक्त पदार्थ.  (अं. कि. रु. 12,00,000/-) ( 3 ) 37 kg 700 gm वजनाचा मेफे ड्रॉन (M.D) हा आम्ली पदार्थ बनविन्याचा कच्चा माल .  (अं. कि. रु 19, 35,00,0), गैर-रासायनिक द्रव आणि आम्लयुक्त पदार्थ तयार करण्‍याची मशिनरी, (अं. किं. रु. 25,00,000/-) (एकुन - 02 कोटी 35 लाख 50 हजार/- रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

             १२ रोजी गोपनीय माहितीनुसार घटनास्थळावर सापळा रचनात आला असता सदर ठिकानी खबरीधील वर्णन प्रमाने ड्रग्ज पेडलर खिस्तीना मॅनलिन उर्फ आयेशा ही महिला मिळून आली.  या महिलेची पंचासमक्ष झडती घेतली असता तिचेकडे कॅप्टिब्रॅट ५० ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) हे आम्लयुक्त पदार्थ मिळूण आले. या महिलेकडे अधिक विचारपूस केली असता तिच्‍याकडे मिळून आलेला अमली पदार्थ तिला एका व्‍यक्‍तीने दिले असल्‍याचे सांगून त्‍याचा पत्ता ढोलगरवाडी (ता.  चंदगड, जि. कोल्हापूर) येथील फॉर्म हाऊस मेफेड्रॉन (एमडी) हा आम्लयुक्त पदार्थ बन विन्याचा कारखाना असल्याबाबत माहीती दिली.  सदर महितीच्‍या आधारे  विशेष तपासी अधिकारी पी. एन. सुतार, पी. एन.  दहिफे, साहा.  तपासी अधिकारी स.पो.नि. वाहेद पठाण, पो.नी. पावे व पोलीस अंमलदारांचे पट्टाकणे यांनी,  ढोलगरवाडी येथे स्थानिक चंदगड पोलीस ठाण्याच्या मदतीने छापा टाकला असता त्या ठिकानी निखिल रामचंद्र लोहार (वय २९ वर्ष), धंदा -नोकरी, रा . मारुती गल्ली, ढोलगरवाडी, ता.  चंदगड, ही व्यक्ती मिळून आली.  त्याच्याकडे अधिक तपास केला असता हे ठिकाण राजकुमार राजहंस यांचे फार्म हाऊस असल्याचे सांगून आपण या ठिकाणी काम करत  असल्‍याचे संगितले.  येथे जप्त केलेला माल  प्रादेशिक सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा, कोल्हापूर येथील रासायनिक विश्लेषक आणि विभाजक यांचे मार्फत तपासनी केली केली असता त्या ठिकानी मेफेड्रॉन' (M.D.) हा आम्लयुक्त पदार्थ बनविन्याकरिता वापरण्यात येणारी रसायने व  ७००. किलो ग्रॅम वजनाचे 'मेफेड्रॉन' (एमडी) हा आम्लयुक्त पदार्थ बनविन्याचा कच्चा माल मिळून आला.  या फार्म हाऊसचे मालक राजकुमार हा मागील काही कालावधीपासून हा व्यवसाय करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच या राजकुमारने मुंबई नगर, इतर राज्यात व आंतरराष्ट्रीय स्तरावरही हे ड्रग्ज विकल्याचा संशय आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी वकिल राजकुमार राजहंस फरारी झाला आहे. हि कारवाई पोलीस आयुक्त (गुन्हे)  मिलिंद भारंबे, अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) वीरेश प्रभू, पोलीस उपायुक्त  दत्ता नलावडे, पी. एन. काळे (एस. पी. ए. आती. कार्य) ऍन्टी ऍसिडिटी सेल यांचे मार्गदर्शनखळी ऍन्टी ऍसिडिटी सेल, वांद्रे युनिटचे पी. पी. पी. एन.  संजय चव्हाण यांचे नेतृत्वाखाली लता सुतार, पो. ना.  दहिफळे, सपोनि वाहेद पठाण, सपोनि सिद्धाराम म्हेत्रे, सपोनि फरीद खान, सपोनि सुरेश भोये, पोउनी पावले, पोउनी पाटील, पो. हे. कॉ.  देसाई आदिनी केली तर  गुन्ह्याचा पुढील तपास  वरिष्ठांचे मार्गदर्शन खली अ. प. वि . कक्ष, वांद्रे युनिटचे स. पो. नि. सुरेश भोये हे करित आहे.

No comments:

Post a Comment