शिनोळीच्या फेअर फिल्ड ॲटलास कंपनीने केले सोनारवाडीच्या तलावाचे पुनःर्जीवन - चंदगड लाईव्ह न्युज

17 November 2021

शिनोळीच्या फेअर फिल्ड ॲटलास कंपनीने केले सोनारवाडीच्या तलावाचे पुनःर्जीवन


सोनारवाडी (ता. चंदगड) येथे तलाव कामाच्या शुभारंभ प्रसंगी पो . निरीक्षक बी. ए. तळेकर, ॲटलास कंपनीचे अनंत पाटील, पांडूरंग पाटील व ग्रामस्थ.

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

         'पाणी हेच जीवन' हे आपण खूपदा ऐकलं आहे.पण दिवसेंदिवस भूजल पातळी घटत चालली आहे.त्यामुळे ऐन उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांना पिकांना पाणी उपलब्ध होत नाही आणि परिणामी हातातोंडाशी आलेले पीक खराब होऊन जाते. याचं गोष्टीची जाणीव ठेऊन DANA फेअरफिल्ड ॲटलास लिमिटेड  शिनोळी (ता. चंदगड) या कंपनीने सोनारवाडी सारख्या दुर्गम भागातील  गावामध्ये असलेल्या छोट्या तळ्याचे रूपांतर बारामाही सिंचन तलावामध्ये केले.

     कंपनीच्या CSR फंडातून काम करत असताना 'संचिता पासून वंचितापर्यंत' या वाक्याची जाणीव ठेवूनच चंदगड तालुक्यातील बऱ्याच विकास कामांना  या कंपनीने  चालना  दिली आहे. आज झालेल्या सोनारवाडी येथील तलावामुळे अजून त्यामधे भर घातली गेली. या उद्धघाटन कार्यक्रमाला चंदगड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बी. ए. तळेकर, सोनारवाडी गावच्या सरपंच, फेअरफिल्ड अटलास कंपनीचे कामगार कल्याण अधिकारी अनंत पाटील, फेअरफिल्ड अटलास कंपनीचे HR पांडुरंग पाटील, कंपनीचे कामगार तसेच सोनारवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment