कामेवाडी क्रिकेट स्पर्धा, अंतिम सामन्यात 'कालकुंद्री' चा 'निपाणी' वर थरारक विजय - चंदगड लाईव्ह न्युज

17 November 2021

कामेवाडी क्रिकेट स्पर्धा, अंतिम सामन्यात 'कालकुंद्री' चा 'निपाणी' वर थरारक विजय

कामेवाडी क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या कालकुंद्री संघातील खेळाडू मान्यवरांच्या हस्ते बक्षीस स्वीकारताना.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

          कामेवाडी (ता. चंदगड) येथील भव्य क्रीडांगणावर खुल्या क्रिकेट स्पर्धा संपन्न झाल्या. स्पर्धेतील थरारक अंतिम सामन्यात कालकुंद्री (ता. चंदगड) येथील कल्मेश्वर क्रिडा मंडळाने बेळगाव स्पोर्ट्स क्लब निपाणी संघावर १६ धावांनी मात केली.  या स्पर्धेत महाराष्ट्र व कर्नाटकातील तुल्यबळ अशा ३२ संघांनी सहभाग घेतला होता. अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कालकुंद्री संघाने सहा षटकात ५७ धावा केल्या. प्रत्युत्तरात निपाणी संघाला ४२ धावांपर्यंत मजल मारता आली. विजेत्या संघाकडून विक्रम पाटील यांने फलंदाजी करताना ४० धावा फटकावल्या तर गोलंदाजीत २ बळी घेत अष्टपैलू कामगिरी बजावली त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर विजेत्या कालकुंद्री संघाला रोख रुपये २१ हजार व चषक देऊन गौरविण्यात आले. विजेत्या संघात विनायक कांबळे, इराप्पा पाटील, राहुल पाटील, शुभम पाटील, अजिंक्य तेऊरवाडकर, आकाश पाटील, राहुल पाटील, शिवराज पाटील, अमन मोमीन, सागर जोशी यांचा समावेश होता. याकामी दिनेश पाटील, अजित पाटील आदींचे सहकार्य लाभले. विजेत्या संघाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment