स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी सर्वानी एकत्र येण्याची गरज - संजय वाघमोडे, यशवंत क्रांती संघटनेची चंदगड तालुका कार्यकारिणी जाहीर - चंदगड लाईव्ह न्युज

04 November 2021

स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी सर्वानी एकत्र येण्याची गरज - संजय वाघमोडे, यशवंत क्रांती संघटनेची चंदगड तालुका कार्यकारिणी जाहीर

पुंद्रा (ता. चंदगड) येथे यशवत  क्रांती संघटनेच्या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र देताना संजय वाघमोडे

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      कानुर पैकी पुंद्रा धनगरवाडा (ता. चंदगड) येथे यशवंत क्रांती संघटनेच्या वतीने पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे होते. 

      प्रारंभी स्वागत बाजी येडगे यांनी केले. यावेळी संजय वाघमोडे डोंगर कपारीत राहणारा धनगर समाज  शेळ्या मेंढ्या जनावरे पालन तसेच रानमेवा मध, फळे, वाळलेल्या लाकडांच्या मोळ्या, फांद्या,औषधी झाडपाला गोळा करून तो पंधरा वीस ते शंभर किलोमीटर वर जाऊन विकून त्यावर गुजरान करत होता. उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नाही. कायद्याची भिती दाखवून वनकर्मचारी जंगलात फिरुन देत नाहीत. मग यांनी जगायचे कसे चराईबंदी कुऱ्हाड बंदी हद्द निश्चिती यासारख्या कायद्यामुळे धनगर वाड्यावरील लोकांची संपूर्ण जीवन साखळीच धोक्यात आली आहे. सरकार रॉकेल व गॅसचा पुरवठा करत नाही आणि वनकर्मचारी लाकूड गोळा करुन देत नाहीत. अशा स्थितीत धनगर समाजाने जगायचे तरी कसे? हा प्रश्न निर्माण झाला आहे. धनगर वाडेच हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. हे थांबून आपले अधिकार मिळवून घेण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. वनहक्क दावे तसेच आपल्या हक्कासाठी सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन केले. यावेळी जिल्हा अरुण फोंडे, करवीर तालुकाध्यक्ष बाळासाहेब कोळेकर यांनी ही मनोगत व्यक्त केली.

  यावेळी यशवंत क्रांती संघटनेची चंदगड तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. तालुकाध्यक्षपदी बयाजी कोंडीबा येडगे (पुंद्रा धनगरवाडा) तर उपाध्यक्षपदी सिद्धू जगू यमकर(काजिर्णे धनगरवाडा) यांची तर महिला तालुकाध्यक्षपदी सविता पिंटू डोईफोडे (बांद्राई धनगरवाडा) यांची निवड करण्यात आली. अन्य पदावर जिल्हासंघटक पदी विठोबा धुळू डोईफोडे (बुझवडे धनगरवाडा), तालुकासंपर्क प्ररमु सुनिल विठ्ठल येडगे (भोगोली धनगरवाडा,)  सरचिटणीस धोंडीबा विठू येडगे(कानुर धनगरवाडा), बाबु रामू लांबोर, रोंगाप्पा विठ्ठल कोकरे, जनार्दन ठक्कू यमकर, भागोजी बमू फोंडे यांच्या निवडी करण्यात आल्या.

No comments:

Post a Comment